Coronavirus : पुणे महापालिकेची यंत्रणा अपुरी; तज्ज्ञ, उपकरणे, मनुष्यबळाचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

पुण्यात अकरा वर्षांपूर्वी ‘स्वाइन फ्ल्यू’ने घातलेल्या थैमानात महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी असल्याचे उघड झाले होते. मात्र, त्यानंतर शहराची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी प्रशासनाने भरीव आर्थिक तरतूद केल्याचे दिसत नाही. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकातही महापालिकेकडे वैद्यकीय तज्ज्ञ, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे, प्रशिक्षित मनुष्यबळ यांचा सध्या अभाव आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आरोग्य विभागाच्या तिजोरीत गेल्या चार वर्षांत १ हजार २०० कोटी रुपये येऊन महापालिकेच्या रुग्णालयांत अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारते आले नाहीत आणि पुरेसे व्हेंटिलेटरही खरेदी करता आले नाहीत. परिणामी, कोरोनाच्या साथीत पुणेकरांसाठी अपेक्षित आरोग्यसुविधा मिळतील का, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. नेमक्‍या सुविधाच नसल्याने कोरोनाच्या साथीत आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पुण्याची लोकसंख्या, महापालिकेच्या रुग्णालयांतील रुग्ण आणि उपचार यंत्रणा लक्षात घेता, आरोग्यासाठीच्या तरतुदीत वाढ अपेक्षित आहे. परंतु, राजकीय आणि प्रशासकीय वादात तरतुदीला कात्री लावण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of manpower due to insufficient specialist equipment of Pune Municipal Corporation