Video : 'त्यांची' हरविली तहान, भूक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

'लॉकडाउन'ची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस चोवीस तास रस्त्यावर आहेत. या काळात कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी नाकाबंदीच्या ठिकाणी जेवणही करणे टाळत आहेत. यामुळे पोलिसांची अक्षरश: तहान, भूकच हरविल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी - 'लॉकडाउन'ची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलिस चोवीस तास रस्त्यावर आहेत. या काळात कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी अनेक पोलिस कर्मचारी नाकाबंदीच्या ठिकाणी जेवणही करणे टाळत आहेत. यामुळे पोलिसांची अक्षरश: तहान, भूकच हरविल्याचे दिसून येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील सिमारेषेवर 13 ठिकाणी तपासणी नाके तसेच सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण 63 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. येथे चोवीस तास तपासणी केली जात आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबाबत काहीही कल्पना नसते. अशा व्यक्तींची तपासणी करताना पोलिसांसाठी जोखमीचे ठरते. अशातच संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवायला सांगितले जात असले तरी त्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याचीही उपलब्धता हवी असते. मात्र, काही ठिकाणी पाणी व सॅनिटायझर उपलब्ध नसल्याने अधिकारी, कर्मचारी नाकाबंदीच्या ठिकाणी जेवण करण्याचे टाळतात. 

अनेक पोलिस कर्मचारी घरातूनच जेवण करुन निघतात. त्यानंतर बारा तासाच्या ड्युटीनंतर पुन्हा घरी गेल्यानंतरच जेवण करतात. अशाप्रकारे कोरोनाच्या धास्तीने ड्युटीवर असताना जेवण करणेही शक्‍य होत नसल्याने पोलिसांना उपाशीपोटी कर्तव्य बजवावे लागत असल्याचे दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Police Life food work stress