Coronavirus : वैद्यकीय तज्ज्ञांसाठी फुप्फुस हीच युद्धभूमी

Lungs
Lungs
Updated on

पुणे - कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम आक्रमण करतो तो मानवाच्या श्‍वसन संस्थेवर. त्यातून फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. या कोरोनाविरोधातील युद्धात वैद्यकीय तज्ज्ञांसाठी फुफ्फुस हीच युद्धभूमी असते. फुप्फुसावरतीच तज्ज्ञांना लक्ष केंद्रित करावे लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार कसे करायचे या एकाच काळजीने आता जग हादरले आहे.

जगभरात कोरोनाबाधीत सर्व रुग्णांचे मृत्यू आयसीयूमध्ये झाले आहेत. कोरोना रुग्णांचे व्यवस्थापन आयसीयूमध्ये कसे करायचे, याचे आव्हान सध्या अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांपुढे आहे. कारण, आयसीयूमध्ये एक बरोबर एक असं समीकरण कधीच नसतं. तिथंली समीकरणं वेगळी असतात. तिथं एक बरोबर सहा असं समीकरण असतं.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्ण सुरवातीला न्यूमोनिया म्हणून येतो. पण, त्याच्या मूत्रपिंडाचे कार्यक्षमता कमी झालेली असते, यकृताचे काम थांबण्याचा धोका असतो, हृदय बंद पडण्याची शक्‍यता असते यामध्ये तो रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. फुफ्फुसाचे कार्य कमी होते. त्याचा परिणाम मेंदूसह वेगवेगळ्या अवयवांना प्राणवायू पुरविण्याच्या व्यवस्थेवर होतो. या सगळ्या कारणांमुळे कोरोनाच्या युद्धात फुफ्फुस हा उपचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याची कार्यक्षमता शक्‍य तितक्‍या लवकर वाढवता येईल, यावर उपचारपद्धतीवर आता जगभरातील आयसीयूतज्ज्ञ संशोधन करत आहेत. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसीनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘फुफ्फुसाचे कार्य परिणामकारकपणे करतील अशा अद्ययावत व्हेंटीलेटरची गरज असते.’’

सांघिक प्रयत्न गरजेचे 
अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्‍टर एकटा काहीच करू शकत नाही. त्यातही कोरोनाच्या विरोधातील रुग्णावर उपचार करताना तज्ज्ञ आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची सर्वोत्तम टिम लागते. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) निश्‍चित केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे उपचार करत असताना रुग्णालयाची एक सुसंगत व्यवस्था उपयुक्त ठरते. 

अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांनी अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराचे विशेष प्रशिक्षण घेतलेले असते. कोरोनाबाधीत रुग्ण काही वेळा अचानक अत्यवस्थ होतो. अशा वेळी स्वतःची सुरक्षा घेऊन रुग्णावर प्रभावी उपचार करावे लागतात. त्याचे प्रशिक्षण आणि त्याचा सराव सातत्याने करण्यात येतो. त्यामुळे प्रत्यक्षात रुग्णसेवा करताना कोणतीही समस्या उद्भवणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. 
- डॉ. कपिल झिरपे, माजी अध्यक्ष, आयएससीसीएम  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com