Coronavirus : मावळ तालुका भाजपाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत सुमारे सात ते आठ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणामाल व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येत आहे.

वडगाव मावळ - मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत सुमारे सात ते आठ हजार कुटुंबांना एक महिना पुरेल एवढा किराणामाल व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येत आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांकडून प्रत्येकी शंभर किलो धान्य, गोडेतेल, तूरडाळ, तांदूळ, गहू, ज्वारी, अशा प्रकारच्या विविध वस्तू जमा करण्यात आल्या. वडगाव येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये सर्व वस्तू एकत्रित करून त्याचे छोटे-छोटे कीट बनवण्यात आले व ते तालुक्यातील विविध शहरे, गावे व वाड्यावस्त्यांवर पोच करण्यात आले. कुणे नामा या आदिवासी गावामध्ये सरपंच संदीप उंबरे यांच्या मदतीने सुमारे दोनशे कुटुंबांना अशा प्रकारचे कीट देण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे,  प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, संदीप उंबरे, सचिन येवले, प्रदीप हुलावळे आदींसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आघाडीच्या वतीने आदिवासी भागातील महिलांसाठी मास्कचे वाटप करण्यात आले. तहसीलदार बर्गे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ वारिंगे, प्रदिप  धामणकर, नितीन मराठे, नितीन घोटकुले, रवींद्र शेटे, देवाभाऊ गायकवाड, दत्तात्रेय शेवाळे, चेतन मानकर, संदीप उंबरे, मच्छिंद्र केदारी, रोहिदास असवले, शांताराम कदम नारायण बोडके, किरण राक्षे, सुनील चव्हाण, शेखर दळवी, अर्जुन पठारे, गणेश धानिवले आदींनी उपक्रमाचे संयोजन केले.

दरम्यान, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या वतीने सुद्धा दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटण्यात येत आहेत.  उज्वला गॅस योजनेतील गॅस धारकांना तीन महिने मोफत गॅस देण्याचे काम सुद्धा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maval taluka BJP supplies essential items