केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

शहरातील १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी व गुरुवारी केवळ दुध विक्री केंद्रे सकाळी दहा ते बारा या दोन तासासाठी सुरू राहणार असून, इतर सर्व आस्थापना व सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. 

पुणे - शहरातील ज्या परिसरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शहरातील १० पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी व गुरुवारी केवळ दुध विक्री केंद्रे सकाळी दहा ते बारा या  दोन तासासाठी सुरू राहणार असून, इतर सर्व आस्थापना व सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश सह पोलिस आयुक्त डाॅ. शिसवे यांनी मंगळवारी रात्री उशीरा दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉ.शिसवे यांनी दिलेल्या आदेशानुसार,बुधवार सकाळी 6 पासून ते गुरूवारी (ता.23) रात्री 12 पर्यंत दूध वगळता इतर सर्व आस्थापना व सेवा बंद राहणार आहेत. किराणामाल, भाजीपाला व फळे, चिकन, मटन अंडी, व इ-काॅमर्स यांची दुकाने व वितरण सेवा पुर्ण बंद राहतील. समर्थ, खडक , फारासखाना, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी, कोंढवा, वानवडी या पोलिस ठाण्याच्यां हद्दीतील परिसराचा त्यामध्ये समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk center will open for two hours in pune