गरजू लोकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

पिंपरी शहरातील गरजू लोकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संस्था-संघटनांनी पुढाकार घेतला आहे. २३ हजार ८०५ जेवणाचे २३ हजार ८०५ इतके डबे घरपोच देतानाच गरजू कुटूंबांना १५ दिवसांचे धान्य देण्यात आले आहे. या शिवाय, विविध भागांतील अन्नछत्रांद्वारे सुमारे ४० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

पिंपरी - शहरातील गरजू लोकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संस्था-संघटनांनी पुढाकार घेतला आहे. २३ हजार ८०५ जेवणाचे २३ हजार ८०५ इतके डबे घरपोच देतानाच गरजू कुटूंबांना १५ दिवसांचे धान्य देण्यात आले आहे. या शिवाय, विविध भागांतील अन्नछत्रांद्वारे सुमारे ४० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था ही करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संघ परिवाराच्या सेवा कार्याची माहिती देताना पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक डॉ.गिरीश आफळे यांनी म्हटले आहे की, " एकटे राहून शिक्षण घेणारे बाहेर गावचे विद्यार्थी, तरूण नोकरदार, झोपडपट्टया, नागरी वस्त्या, भटक्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, ट्रकचालक, बांधकाम मजूर आदींसाठी २ वेळेच्या तयार जेवणाचे २३ हजार ८०५ डबे घरपोच देण्याची सोय करण्यात आली. गरजू कुटूंबांना १५ दिवसांचे गव्हाचे पीठ, तांदूळ, तूरडाळ, मसाले, खाद्यतेल आदींच्या २१०७ शिधा पिशव्या घरपोच देण्यात आल्या आहेत. तसेच भाजी मंडई, किराणा व आैषधांची दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी स्वयंसेवकांनी ५ हजार ठिकाणी चुन्याने सुरक्षित अंतराचे पट्टे आखले आहेत. रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून १ हजार रक्त दात्यांची नोंदणी करून शिबिरे भरविण्यासाठी सज्जता ठेवण्यात आली आहे. या खेरीज, ना नफा, ना तोटा या तत्वावर भाजीपाला, ज्येष्ठ नागरिकांसाठी आैषधे, जेवणाची सोय तसेच आवश्यकतेनुसार त्यांचे व त्यांच्या कुटूंबियांचे समुपदेशन केले जात आहे. या संपूर्ण सेवा कार्यात ३०० स्वयंसेवकांनी सरकारी नियमांचे पालन करत सुमारे ६० हजार गरजू नागरिकांना सेवा पुरविली आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Volunteer Association initiative for the needy