Coronavirus : लॉकडाउनमध्ये व्यवहार सुरळीत होण्यासाठी हे गरजेचे

Lockdown
Lockdown

कोरोनाचे संकट तीव्र होत असल्यामुळे राज्यात लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांच्या सोयीसाठी काही ठिकाणी गरजेनुसार शिथिलता आणण्याचा प्रयत्न असेल. दोन दिवसांत त्याबद्घलची माहिती नागरिकांना देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर नेमक्‍या कोणत्या उपाययोजनांची गरज आहे, प्रशासन काय करीत आहे, विविध घटकांचे यासंदर्भात काय म्हणणे आहे. याबाबतचा हा आढावा...

प्रशासन स्तरावर आवश्‍यक बाबी

  • पोलिस बळाचा अतिरेकी वापर व्हायला नको.
  • सुरक्षित अंतर ठेवून सर्वच भागातील फळ-भाजीपाला मंडई, किराणा दुकाने सुरू हवीत
  • लोकवस्ती लक्षात घेऊन पुरेसा भाजीपाला मिळण्याची व्यवस्था करावी
  • आरोग्य सुरक्षेचे नवे नियम पाळून रिक्षा, प्रवासी वाहतूक सुरू हवी
  • सील केलेल्या परिसराशिवाय अन्यत्र किराणा दुकान, डेअरी, औषध दुकाने आदी अत्यावश्‍यक सेवा सुरू राहणे गरजेचे
  • दूध वितरण सुरळीत हवे 
  • वैद्यकीय कारणांसाठी नागरिकांना वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी 
  • घरपोच खाद्यपदार्थ, किराणा, भाजीपाला 
  • पुरविणाऱ्या सेवा उपलब्ध कराव्यात
  • शासकीय योजनेत धान्य मिळत आहे. परंतु, धान्य दळण्यासाठी गिरण्या सुरू करण्यास परवानगी द्यावी
  • ग्रामीण भागातील भाजीपाला थेट सोसायट्यांपर्यंत पोचण्यासाठी सुरळीत व्यवस्था हवी. यासाठी पोलिस, आरटीओ व जिल्हा प्रशासनाने परवानगी द्यावी.

नागरिकांनी घ्यायची काळजी

  • सुरक्षित अंतराची कठोर अंमलबजावणी करावी
  • अनावश्‍यक खरेदीवर नियंत्रण हवे. गरजेच्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य द्यावे
  • अनावश्‍यक, टाळता येणाऱ्या कारणांसाठी प्रवास नको
  • लांबणीवर टाकता येणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन नको
  • प्रत्येकाने मास्कचा वापर करावा  

अशी आहे प्रशासकीय तयारी 

  • खासगी रुग्णालयांत कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांची व्यवस्था वाढविली 
  • घरोघरी आरोग्य तपासणीसाठी १२८ पथके नियुक्त 
  • ४२ ठिकाणी भाजी विक्रीची केंद्रे 
  • जास्त रुग्णसंख्या असल्यामुळे फरासखाना, खडक, कोंढवा, स्वारगेट या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील भाग सील
  • संशयित रुग्ण आढळल्यास त्याची रवानगी लगेचच रुग्णालयात
  • संशयितांचे जागेवरच नमुने संकलित करण्यासाठी पथके तयार

हे सध्या बंद आहे   

  • हॉटेल, बार, उपहार गृहे 
  • अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व प्रकारचे मॉल, दुकाने, स्टॉल, पथाऱ्या  
  • महापालिका उद्याने
  • सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक  
  • सर्व प्रकारची शासकीय,निमशासकीय कार्यालये 
  • सरसकट पेट्रोल, डिझेल, सीएनजी विक्री बंद

लॉकडाउनमध्ये शिथिलता कशी आणि कोठे द्यायची, याबाबत राज्य सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. मात्र, अत्यावश्‍यक सेवा आणि वस्तू यांचा पुरवठा विनाअडथळा सुरूच राहणार आहे.
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

रुग्णांची संख्या १४ एप्रिलनंतर कमी होते का वाढते, यावरच शिथिलता देण्याचा निर्णय अवलंबून असेल. नागरिकांना असे आवाहन करण्यात येते, की रेशन दुकानांमध्ये गर्दी करू नये. 
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

शेतीमाल शहरापर्यंत पोचविण्यासाठी वाहतूक व्यवस्था गरजेची आहे. मोठ्या मैदानांवर खुल्या बाजारपेठा निर्माण करण्याचीही गरज आहे. तेथे खरेदीसाठी अटींवर परवानगी देता येईल.
- शेखर गायकवाड, आयुक्त, पुणे महापालिका

किराणा-भुसार दुकाने आणि वाहतूक विनाअडथळा सुरू ठेवावी. भाजीपाला, फळेही मिळायला पाहिजे. किराणा दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवावीत.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, पुणे मर्चंटस चेंबर

मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजार सुरू असायला हवा. मात्र, तेथे किराणा दुकानदारांनाच प्रवेश द्यायला हवा. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने किरकोळ दुकानदारांकडून ऑनलाइन स्वरूपात यादी मागवून डिलिव्हरी करता येईल. 
- राज अग्रवाल, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com