पुणे, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजकांना सवलत नाही : विभागीय आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

या क्षेत्रामध्ये फक्त औषधी, एलपीजी अशा अत्यावश्यक सेवांना 17 एप्रिलपूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा सुरू राहतील. परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

पुणे :  कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु  पुणे, पिंपरी-चिंचवड, ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये  कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या क्षेत्रामध्ये फक्त औषधी, एलपीजी अशा अत्यावश्यक सेवांना 17 एप्रिलपूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा सुरू राहतील. परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No concession to entrepreneurs in Pune and Pimpri Chinchwad said Divisional Commissioner