Video : ...अन्‌ तीस रुपयांसाठी झाडला रस्ता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

'ताई...पेट की आग शांत बैठने नहीं देती. भूख की वजह से सुबह तक नींद नहीं आती. जल्दी उठ जाता हूँ. महापालिका के लोंगो के साथ मिलकर रास्ता साफ करता हूँ. तो वो लोग मुझे तीस रुपये दे देते हैं. मालिक लॉकडाउन की वजह से मुंबई में अटक गया है. पॉंच हजार रुपये पगार मिलती है. उसमें गुजारा कर लेता था. उसमें से बचे महिना दो हजार रुपये गॉंव को मनी ऑर्डर भी करता हूँ. लेकीन इस वक्त ओ भी पैसा नहीं गया. वहॉं मेरे पोते क्‍या खाते होगे. पता नहीं ताई...ये लॉकडाउन कब खुलेगा..?'

लॉकडाउनमुळे कपंनीचा मालक अडकला मुंबईत : ज्येष्ठावर उपासमारीची वेळ
पिंपरी - 'ताई...पेट की आग शांत बैठने नहीं देती. भूख की वजह से सुबह तक नींद नहीं आती. जल्दी उठ जाता हूँ. महापालिका के लोंगो के साथ मिलकर रास्ता साफ करता हूँ. तो वो लोग मुझे तीस रुपये दे देते हैं. मालिक लॉकडाउन की वजह से मुंबई में अटक गया है. पॉंच हजार रुपये पगार मिलती है. उसमें गुजारा कर लेता था. उसमें से बचे महिना दो हजार रुपये गॉंव को मनी ऑर्डर भी करता हूँ. लेकीन इस वक्त ओ भी पैसा नहीं गया. वहॉं मेरे पोते क्‍या खाते होगे. पता नहीं ताई...ये लॉकडाउन कब खुलेगा..?'

लतिल्ला कटगी यांची ही लॉकडाउनमधील व्यथा. मूळचे ते कर्नाटकचे. जिल्हा- बिजापूर, गाव -अलमट्टी येथील आहेत. दापोडीतील एका खासगी कंपनीत वीस वर्षापासून ते सुरक्षारक्षकाची नोकरी ते करतात. त्याचं वय आता 75च्या आसपास आहे. लॉकडाउनपूर्वी ते रस्त्यावरील हातगाडीवर रोज मिसळ, वडापाव किंवा मिळेल ते खाउन पोटाची खळगी भरत. सध्या त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी कोणतीच साधनं नसल्याने उपासमार होत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उरलेल्या वेळेत ते रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे अन्नासाठी आशाळभूत नजरेने पाहत बसतात. त्यानंतर कासारवाडीतील आई माता मंदिरात काही खायला मिळेल या आशेने अख्खा दिवस काढतात. अवघ्या 30 रुपयांत ते रोजचा खर्च भागवित आहेत. ते ही दैनंदिन मिळत नाहीत. कंपनीचा मालक जेव्हा शहरात येईल तेव्हाच त्यांना पैसे मिळण्याची आशा उरली आहे. गावाकडचीही चिंता त्यांना सतावत आहे. सर्वांची पोटं हातावरची आहेत. त्यामुळे नातवंडं काय खातील? गावाला कधी जायला मिळेल? असे अनेक प्रश्‍न त्यांच्या डोक्‍यात घोंघावत होते. मी बाहेर गावचा असल्याने मला कोणी पैशाची मदतही करणार नसल्याचे ते म्हणाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: old man road clean for 30 rupees