डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांचे विमा कवच; कोठे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य, तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांचा कोरोनाचा संसर्ग झालेल्या व संशयित रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचाही थेट संपर्क येवू शकतो. त्यामुळे त्यांना योग्य सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे.

पिंपरी - 'कोरोना'च्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांना एक कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच लागू करणेचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य, तसेच इतर विभागातील कर्मचा-यांच्या नेमणुका केलेल्या आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करीत आहेत. त्यांचा कोरोनाचा संसर्ग झालेल्या व संशयित रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचा-यांचाही थेट संपर्क येवू शकतो. त्यामुळे त्यांना योग्य सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी त्यांना महापालिकेमार्फत सुरक्षा कवच म्हणून दुर्घटने पश्चात एक कोटी रक्कम देणे व त्यांचे वारसास महापालिका सेवेत नोकरी देणे अशा प्रकारची योजना तातडीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करून त्यास संमती मिळाली आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे व  सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one crore rupees insurance security for doctor nurse and employee by municipal