पुणे : विघ्नहर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दिला एक दिवसाचा पगार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी मुख्यमंत्री निधीस (कोविड१९) एक दिवसाचा पगार दिला असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

जुन्नर - येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी मुख्यमंत्री निधीस (कोविड१९) एक दिवसाचा पगार दिला असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एक दिवसाच्या पगाराची रक्कम सात लाख २५ हजार रुपयांच्या रकमेचा धनादेश आमदार अतुल बेनके व सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
राज्यात कोरोनाच्या रुग्णावर  उपचारासाठी मोठा खर्च असल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  मुख्यमंत्री सहायता निधी तथा कोवीड-१९ निधीला सर्व नागरीकांनी हातभार लावावा असे आवाहन केले त्यास कारखान्याचे अधिकारी व कामगार वर्गाने प्रतिसाद देत माहे मार्च-२०२० च्या पगारातील एक दिवसाच्या पगाराची रक्कम दिली आहे.
 
कारखान्याचे माध्यमातून सॅनिटायझरचे उत्पादन सुरू करण्यात आले असून कोरोना संसर्गात काम करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना  दोन हजार लिटर सॅनिटायझरचे मोफत वितरण करण्यात आले आहे. तसेच माफक दरात सॅनिटायझर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ऊसतोड कामगारांना किराणा साहित्य दिले असल्याचे शेरकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One days salary was paid by the employees of the Vighnahar factory