Coronavirus : बारामतीत गरजूंना राष्ट्रवादीचा एक हात मदतीचा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

लॉकडाऊनच्या काळात बारामतीकरांच्या मदतीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धावून आला आहे. जवळपास 50 लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा पुरवठा करण्याचे काम पक्षीय पातळीवर केले गेले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकांची अडचण विचारात घेत तातडीने सर्वांनाच मदतीच्या सूचना स्थानिक पदाधिका-यांना दिल्या होत्या. रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना ही मदत पोहोचविली गेली.

बारामती - लॉकडाऊनच्या काळात बारामतीकरांच्या मदतीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धावून आला आहे. जवळपास 50 लाख रुपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा पुरवठा करण्याचे काम पक्षीय पातळीवर केले गेले. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकांची अडचण विचारात घेत तातडीने सर्वांनाच मदतीच्या सूचना स्थानिक पदाधिका-यांना दिल्या होत्या. रोजंदारी, मोलमजूरी व दैनंदीन काम करणा-या कष्टक-यांना ही मदत पोहोचविली गेली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कौटुंबिक सर्वेक्षण तातडीने करुन शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी या कामी मोलाची मदत केली. सात हजार कुटुंबाची यादी तयार करुन त्यांना गहू, तांदूळ, डाळ व तेल असे किट घरपोच दिले गेले. बारामती मर्चट असोसिएशन व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांसह  संचालक प्रताप सातव व  बाळासाहेब फराटे, श्री काशिविश्वेश्वर मंडळाच्या सदस्यांचेही  विशेष सहकार्य लाभले. 

लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन
1 एप्रिलपासून बारामती शहरात शासनामार्फत रेशन दुकानावर विविध योजनेअंतर्गत धान्य उपलबध आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माणसी दोन रुपये किलो प्रमाणे तीन किलो गहु व तीन रुपये किलो प्रमाणे दोन किलो तांदूळ मिळणार आहे.तसेच अंत्योदय शिधापत्रिका धारकांना 35 किलो धान्य मिळणार असुन एप्रिल,मे ,जून हे तीन महिने शासनाकडून प्रत्येकी माणसी पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे.तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटनेते सचिन सातव यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One hand of NCP to help the needy in Baramati