esakal | coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास
sakal

बोलून बातमी शोधा

Police

'लॉकडाऊन'च्या  कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्तींना पास दिले जाणार आहे. चिंचवड येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात हे पास उपलब्ध होतील.

coronavirus : अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पोलिसांकडून मिळणार पास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - 'लॉकडाऊन'च्या  कालावधीत अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून संबंधित व्यक्तींना पास दिले जाणार आहे. चिंचवड येथील पोलिस उपायुक्त कार्यालयात हे पास उपलब्ध होतील.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या संपूर्ण देशात 'लॉकडाऊन' जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र, अनेकदा या सेवा पुरविणाऱ्या वाहनांची तसेच कर्मचाऱ्यांची अडवणूक केली जाते. अशी अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. 

पिंपरी, चिंचवड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, निगडी, दिघी, चाकण, आळंदी पोलिस ठाणे व म्हाळुंगे पोलिस चौकी या हद्दीतील व्यक्तींना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड येथील पोलिस उपायुक्त परिमंडळ 1 या कार्यालयात पास मिळतील. तर हिंजवडी, वाकड, सांगवी, देहूरोड, चिखली, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे व रावेत, शिरगाव पोलिस चौकी या हद्दीतील व्यक्तींना पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालयात हे पास मिळणार आहेत. या पाससाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे.

loading image
go to top