Coronavirus : पुणेकरांची घरपोच आरोग्य तपासणी; महापालिकेची मोहीम 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 April 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यात ताप, थंडी, सर्दी आणि खोकला असलेल्यांना "होम क्वारंटाइन' किंवा महापालिकेच्या रुग्णालयांत पाठविले होते.

पुणे - कोरोनाला थोपविण्यासाठी महापालिकेने आणखी एक मोहीम हाती घेतली असून, संपूर्ण शहरासाठी "डॉक्‍टर आपल्या दारी'च्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय जैन संघटनेने 11 मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन पुरविल्या आहेत. महापालिका, फोर्स मोटार आणि भारतीय जैन संघटनेतर्फे हा उपक्रम राबवीत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी जाऊन लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यात ताप, थंडी, सर्दी आणि खोकला असलेल्यांना "होम क्वारंटाइन' किंवा महापालिकेच्या रुग्णालयांत पाठविले होते. मात्र, आता डॉक्‍टर, परिचारिका लोकांपर्यंत पोचणार असून, कोणत्याही आजाराची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांवर लगेचच उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही मोहीम सुरू राहणार आहे. त्यासाठी 11 मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनची सोय असून, त्यात डॉक्‍टरसह पाच जणांचे पथक राहील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार !

71 रुग्णालयांत सुविधा 
महापालिकेच्या सर्व म्हणजे 71 रुग्णालयांत अत्याधुनिक सोईसुविधा उभारण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी क्षेत्राने पुढाकार घेण्याचे आवाहन करताच भारतीय जैन संघटनेने प्रतिसाद दिला आहे. कोरोना नियंत्रित येईपर्यंत महापालिकेला सर्व सहकार्य केले जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी सांगितले. या व्हॅनच्या मागणीसाठी 9890174007, 9420477052 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People are being checking from house to house on the background of Corona