Coronavirus : अत्यावश्‍यक सेवेतील पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 April 2020

‘पुष्पक’ अहोरात्र उपलब्ध
पीएमपीची ‘पुष्पक’ शववाहिनी आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अहोरात्र उपलब्ध राहणार आहे. त्यासाठी नागरिकांनी २४५०३२११/१२ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी केले आहे.

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या ‘सुरक्षा कवच’ योजनेमध्ये ‘पीएमपी’च्या अत्यावश्‍यक सेवेतील सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी मागणी प्रशासनाने एका पत्राद्वारे केली आहे. तसेच, या योजनेतून ’पीएमपी’ला वगळल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा सामना करताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांचा निधी आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही अशाच प्रकारचा निर्णय घेतला आहे. मात्र, या दोन्ही महापालिकांनी ‘पीएमपी’च्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश केलेला नाही. अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत सध्या ‘पीएमपी’च्या १२० बस सुरू आहेत. या बसची वाहतूक सुरू राहावी, यासाठी पीएमपी’चे चालक, वाहक, मॅकेनिक, फिटर, तिकीट तपासनीस आदी सुमारे एक हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनाही दोन्ही महापालिकांनी ‘सुरक्षा कवच’ योजनेत सहभागी करुन घ्यावे, अशी मागणी ‘पीएमपी’चे सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांनी गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP personnel in critical service also need protection armor