Vidoe : कोरोना विरुध्द लढणारे डाँक्टर व पोलिसांना कवितेतून अभिवादन...

मिलिंद संधान
Saturday, 18 April 2020

हार मत देना प्रभु, डॉक्टर रूपी दूत हमारे साथ है... यासारख्या स्वरचीत कवीतांमधून कोरोनाच्या लढाईत आरोग्य सैनिक म्हणून लढणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करून प्राध्यापिका डॉक्टर रिना मालपाणी यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. कोरोनाच्या संघर्षमय लढाईत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रूग्नवाहिका चालक यांच्यासह सर्वच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्राध्यापिका रिना यांनी आपल्या कवितेतून सँल्युट केला आहे.

नवी सांगवी (पुणे) - हार मत देना प्रभु, डॉक्टर रूपी दूत हमारे साथ है... यासारख्या स्वरचीत कवीतांमधून कोरोनाच्या लढाईत आरोग्य सैनिक म्हणून लढणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करून प्राध्यापिका डॉक्टर रिना मालपाणी यांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. कोरोनाच्या संघर्षमय लढाईत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, रूग्नवाहिका चालक यांच्यासह सर्वच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्राध्यापिका रिना यांनी आपल्या कवितेतून सँल्युट केला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मूळच्या नागदा, मध्यप्रदेश येथील रहिवाशी असलेल्या रिना या सध्या त्यांचे पती व संरक्षण विभागात सहायक लेखाधिकारी म्हणून काम करणारे रवी मालपाणी यांच्यासमवेत आळंदी रोड, दिघी कँम्प येथे रहात आहेत. ऑरगँनिक केमिस्ट्री मध्ये डॉक्टरेट ( पीएचडी ) केलेल्या रिना यांनी उज्जैन व जबलपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात तर रतलाम येथील आर्ट्स आणि सायन्स कॉलेज मध्ये केमिस्टी विषयाचे अध्ययन अध्यापन केले आहेत. अशा या उच्चविद्याविभुषीत महिलेला कोरोनाच्या युध्दात डॉक्टर व पोलिस यांच्याबाबत दररोज टिव्ही व वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्यांमुळे मनाला असह्य वेदना होत होत्या. त्याच भावनेतून त्यांनी यावर कविता रचून कृतज्ञतेपोटी आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

कोरोना लढाई के शूरवीर यौध्दा... या कवितेतून त्यांनी पोलिसांचे मनोबल कसे उंचावेल याबद्दल आपल्या भावना विषद केल्या आहेत. तर  कोहराम, प्रशासन संघर्ष अविराम या शिर्षकातून त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबद्दल गौरवोद्गार काढले आहे. यात त्या लिहितात, कोरोना हाहाकार, लॉकडाऊन एकमात्र उपचार..., बिकट परिस्थितीयोमे अनुशासन को हथियार बनाना है. यासारख्या अनेक कविता त्यांनी स्वतः रचल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poets salute doctors and police who fight against Corona