लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांनी आकारले ज्यादा भाडे; मग...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

जादा भाडे आकारणी केल्याबद्दल 29 रिक्षाचालकांची वैद्यकीय सेवेसाठी सुरू असलेल्या रिक्षा उपक्रमातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

पुणे : जादा भाडे आकारणी केल्याबद्दल 29 रिक्षाचालकांची वैद्यकीय सेवेसाठी सुरू असलेल्या रिक्षा उपक्रमातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मेडिकल इमर्जन्सी असेल तर नागरिकांनी 98591 98591 या क्रमांकावर फोन केल्यास त्यांना या रिक्षा उपलब्ध होतात. त्यासाठी मीटरनुसार पैसे घेतले जातात. परंतु या काळातही 29 रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून जास्त पैसे घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे खातरजमा करून त्यांची या योजनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी पोलिसांनी 257 रिक्षाचालकांना पास देऊन परवानगी दिली आहे. त्यात आता 228 रिक्षा आहेत, अशी माहिती या योजनेचे समन्वयक राहुल शितोळे यांनी दिली.

सध्या रोज सुमारे 300 ते 350 प्रवाशांना रिक्षा सेवा पुरविली जाते. 25 मार्चपासून 17 एप्रिलपर्यंत सुमारे 4 हजार प्रवाशांनी या योजनेचा वापर केला आहे. रोज सुमारे 800 ते 1000 प्रवासी कॉल करतात. त्यातून मेडिकल इमर्जन्सी असलेल्या प्रवाशांना रिक्षा पुरविली जाते, असे त्यांनी सांगितले. 

रिक्षा पंचायत, पुणे ऑटो रिक्षा फेडरेशन, ऑटो ग्लाइड, आरटीओ, वाहतूक पोलिस आणि बाबा शिंदे यांच्यातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taken Action Against who Charge Extra Money for Fare