#Lockdown2.0 : पोलिस पत्नीने जाणल्या पोलिसांच्या व्यथा

रमेश मोरे
Friday, 17 April 2020

पोलिसांची नोकरी म्हणजे नेहमीची सतत धावपळ व दगदग या लॉकडाऊन काळात ती आधिकच वाढली आहे. समाजातील अनेक घटनांसाठी, नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारा पोलिस हा महत्वाचा घटक.

लॉकडाऊनमधे कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-यांना देताहेत चहा नाश्त्याची सेवा
जुनी सांगवी - पोलिसांची नोकरी म्हणजे नेहमीची सतत धावपळ व दगदग या लॉकडाऊन काळात ती आधिकच वाढली आहे. समाजातील अनेक घटनांसाठी, नागरीकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारा पोलिस हा महत्वाचा घटक.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्तव्यावर असलेल्या पोलिसातील हा माणूस नागरीकांच्या सुरक्षेसाठी घड्याळाच्या परिघाबाहेर राहून काम करतो. सध्याच्या लॉकडाऊन काळात हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. नागरीकांना घरातच राहा, घराबाहेर पडू नका म्हणून चौक, रस्ते, गल्लीबोळांमधून भावनिक आवाहन करताना तर कधी नाविलाजास्तव दुस-यांच्या सुरक्षेखातर दंडुके देणारा पोलिस पहायला मिळतो. उन्हातान्हात नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावताना पोलिसातील माणसाची मात्र परवड होतेय मग यात चहा, नाश्त्या पासून जेवणाचा झालेला अवमेळ ही पाहायला मिळतो.जेवणाच्या चुकलेल्या वेळा, चौकात झाडाच्या सावलीखाली, जागा मिळेल तिथे दुपारचा डबा खातानाचे प्रसंग लॉकडाऊनच्या काळात अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. पोलिस कर्मचा-यांची हि व्यथा जाणली आहे एका पोलिस पत्नीने जुनी सांगवीतील जयराज सोसायटीत राहणा-या कविता नम या जुनी सांगवी परिसरात कर्तव्यावर असलेल्या रोज चाळीस कर्मचा-यांना सकाळी व सायंकाळी त्या त्या ठिकाणी जावून रोज चहा व नाश्त्याची सेवा देत आहेत.

कविता नम यांचे पती नितिन नम हे हवेली ग्रामीण पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक म्हणून सेवेत आहेत. पोलिस कुटूंबातील धावपळ काय असते हे मी गृहिणी म्हणून चांगले ओळखते या लॉकडाऊनमधे ती आधिक वाढली आहे. यात आपणही सेवा कार्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून सांगवी परिसरातील चौकांमधून ठिकठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील बस कर्मचा-यांना त्या चहा नाश्त्याची सेवा देत आहेत. या कामात नववीत शिकणारा मुनित व पाचवीत शिकणारा विनित आईला घरात या कामात हातभार लावतात असे कविता नम सांगतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police wife knew of the police woes