esakal | Coronavirus : पुढील आदेश येईपर्यंत पुणे मार्केट यार्ड बाजार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Market-Yard

अडते, व्यापारी, कामगार, टेंपोचालक यांच्या अनुपस्थितीमुळे बाजार आवारातील कामकाजावर होणारा परिणाम तसेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा व केळी बाजार शुक्रवार (ता. १०) पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्णय सर्व संघटना आणि बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Coronavirus : पुढील आदेश येईपर्यंत पुणे मार्केट यार्ड बाजार बंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड - अडते, व्यापारी, कामगार, टेंपोचालक यांच्या अनुपस्थितीमुळे बाजार आवारातील कामकाजावर होणारा परिणाम तसेच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा व केळी बाजार शुक्रवार (ता. १०) पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत बंद कायम ठेवण्याचा निर्णय सर्व संघटना आणि बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील ज्या भागात पोलिसांनी कडक निर्बंध घातले आहेत, त्या भागात मार्केट यार्डातील ६० ते ७० टक्के अडते, व्यापारी, कामगार राहत आहेत. या परिस्थितीत बाजारात काम करणे योग्य ठरणार नसल्याचे निवेदन अडते असोसिएशन आणि कामगार संघटनेने बाजार समितीला दिला होते. त्यांनतर समिती प्रशासन आणि विविध संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीत समितीकडून बंदचा निर्णय घेण्यात आला, असे कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी सांगितले.

loading image
go to top