Coronavirus : आतापर्यंत पुण्यात तब्बल एवढ्या जणांचे ‘होम क्वारंटाइन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

नागरिकांचे आभार
जनता कर्फ्युला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. या सर्वांचे शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी आभार मानले. अशा प्रकारे लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुणे - देशांतर्गत विमानप्रवास करून आलेल्या १ हजार ७६२ प्रवाशांना घरीच विलगीकरण करून राहण्याच्या (होम क्वारंटाइन) सूचना दिलेल्या आहेत. रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत २१ विमानांद्वारे हे प्रवासी लोहगाव विमानतळावर आले. सद्यःस्थितीत विलगीकरण कक्षामध्ये कोणालाही पाठविण्यात आले नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शनिवारी (ता. २१) देशांतर्गत विमान प्रवास करून ३ हजार ८४० प्रवासी लोहगाव विमानतळावर आले. या सर्वांना घरीच थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ते २१ मार्चपर्यंत २ हजार ६९० प्रवासी आले असून, त्यांनी स्वयंघोषणापत्रे भरून दिलेली आहेत. त्यापैकी अतिजोखीम प्रवासी १५ असून, यामध्ये ९ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. या सर्वांना नायडू हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे, तर ११४ प्रवाशांना सारसबाग येथील सणस कॉप्लेक्‍स येथे संस्थात्मक विलगीकरणसाठी पाठविण्यात आले आहे. सद्यःस्थितीत तिथे २८ प्रवाशांचे विलगीकरण केले आहे. उर्वरित सर्व प्रवाशांना घरीच विलगीकरण करून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली आहे.

Video : पुणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine is home to so many in Pune till now by coronavirus