Coronavirus : बारामतीतील 'त्या' आठ जणांचे रिपोर्टस् समोर; ते सर्वजण...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 March 2020

- शहरातील कोरोनाग्रस्त रिक्षाचालकांच्या नातेवाईकांचे सर्व रिपोर्ट आले समोर.

बारामती : शहरातील भिगवण रस्त्यावरील रिक्षाचालक कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कातील आठ नातेवाईकांना नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट आले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कोरोनाग्रस्त रिक्षाचालकांच्या नातेवाईकांचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. या सर्व नागरिकांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. 

घाबरू नका! देशात मृतांचा आकडा वाढणार ...

शहरातील ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता, तो भाग अजूनही सील केला असून, त्या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये, यासाठी पोलिस यंत्रणाही झटते आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reports of Eight Peoples are Negative in Baramati