Coronavirus : ‘स्मार्ट सारथी ॲप’ची साथ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

क्‍लिक, स्कॅन करा 
मराठी व इंग्रजी भाषांमध्ये ॲप उपलब्ध असून ते डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्‍लिक करावे. किंवा क्‍यूआर कोड स्कॅन करावा, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. गुगल प्ले स्टोअरमध्ये https://bit.ly/PCMCSmartSarathiApp आणि ॲप स्टोअरमध्ये  https://bit.ly/PCMCSmartSarathiIOS येथे क्‍लिक करावे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका, स्मार्ट सिटी कंपनीचा उपक्रम
पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रादुर्भाव रोखणे, नागरिकांची तपासणी, सर्वेक्षण व मदतीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल ॲप व वेबपोर्टल विकसित केले आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी हे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैयक्तिक सर्वेक्षण
या ॲपवरील वैयक्तिक सर्वेक्षणाद्वारे नागरिकांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. त्यांनी दिलेल्या माहितीतून संसर्गाची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय पथक संबंधित व्यक्तीशी संपर्क साधून साह्य करीत आहे. यासाठी ॲपद्वारे नागरिकांनी कुटुंबाची माहिती भरणे आवश्‍यक आहे.

स्वयंसेवक नियुक्त 
नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. त्यामुळे शहरातील तरुण व निरोगी नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून सहकार्य करावे. स्वयंसेवकांनी पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲपद्वारे नोंदणी करावी.

ताज्या घडामोडी
महापालिकेतर्फे प्रसारित परिपत्रके, बातम्या, बैठकांचे वृत्त, केंद्र व राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, परिपत्रके ‘सारथी’वर आहेत. त्यावरील माहिती विश्‍वासार्ह असल्याने नागरिकांनी ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप’ डाऊनलोड करावे.

निवारा व अन्न वाटप
बेघर, मजूर, कामगार व स्थलांतरितांसाठी महापालिकेने तात्पुरता निवारा केंद्र उभारली आहेत. त्यांच्या मोफत भोजनाचीही सुविधाही आहे. याबाबतची माहिती ॲपवर उपलब्ध आहे.

जवळच्या ठिकाणांचा शोध
‘सारथी ॲप’मध्ये ‘माझ्या आजूबाजूला’ अशी सुविधा आहे. त्याद्वारे नागरिकांना नजीकच्या जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांची यादी मिळेल. यात औषधी, किराणा, भाजीपाला, रुग्णालये आदींचा समावेश आहे. तसेच, जीवनावश्‍यक वस्तू घरपोच पुरवठा करणारी दुकाने, कोरोना तपासणी केंद्र अर्थात रुग्णालये, डॉक्‍टर यांचे पत्ते आणि संपर्क क्रमांक आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Sarathi with mobile app support for coronavirus against