लघु-मध्यम उद्योगांना विशेष अर्थ सहाय्य द्यावे - पिंपरी चिंचवड चेंबरची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

'लॉकडाऊन मुळे लघु-मध्यम उद्योगांकडे येणे थांबले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने उद्योजकांना विशेष अर्थ सहाय्य द्यावे. तसेच एप्रिल महिन्यात कामगारांना पगाराएेवजी घर खर्चासाठी ठराविक रक्कम देण्याचे आवाहन कंपनी मालकांना करावे", अशी मागणी पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स अँड सर्व्हिसेसने केली आहे.

पिंपरी - 'लॉकडाऊन मुळे लघु-मध्यम उद्योगांकडे येणे थांबले आहे. त्यामुळे, राज्य सरकारने उद्योजकांना विशेष अर्थ सहाय्य द्यावे. तसेच एप्रिल महिन्यात कामगारांना पगाराएेवजी घर खर्चासाठी ठराविक रक्कम देण्याचे आवाहन कंपनी मालकांना करावे", अशी मागणी पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स अँड सर्व्हिसेसने केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संघटनेचे अध्यक्ष अॅड. अप्पासाहेब शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्योगांकडे पैसे येणे थांबले आहेत. त्यामुळे, सर्व बँकांनी खातेदार उद्योजकांना त्यांच्या येणे रक्कमेपैकी ७५ टक्के रक्कम ९० दिवसांसाठी बिनव्याजी विशेष अर्थ सहाय्य म्हणून द्यावी. या उद्योगांसाठी अपेक्षित ९० दिवसांचा निधी बँकांनी परस्पर मोठ्या उद्योगांना देऊ नये. पिंपरी चिंचवड एमआयडीसी मधील कामगारांचे ३१ मार्चचे पगार उद्योजक कसे बसे करत आहेत. एप्रिल ते जून पर्यंत कारखाने उघडतील असे चित्र सध्यातरी दिसत नाही. त्यामुळे, सरकारने विशेष पगार सहाय्य योजना राबवावी. कंपनी मालकांना कामगारांना घर खर्चासाठी ठराविक रक्कम देण्याचे आवाहन करावे. सध्या बीएस - ४ वाहने मोठ्या प्रमाणावर विक्री अभावी पडून आहेत. हे लक्षात घेऊन बीएस - ६ वाहने विक्री कायदा १ एप्रिल २०२१ पासून लागू केला जावा.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special financial assistance should be given to small and medium enterprises