Coronavirus : कोरोनामुक्ती लढ्यात विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळही मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 April 2020

रक्तदान करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची रक्तगटनिहाय सूची करणे, कमवा व शिका योजनेतील १२ हजार विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून फेस मास्क तयार करून वाटप करणे, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्यांपैकी दहा कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी दत्तक घेणे, तसेच आवश्यकतेनुसार महाविद्यालयातर्फे सॅनिटायझर तयार करून वितरीत करणे, अशा स्वरूपात मदतकार्य उभे करून कोरोनामुक्ती व जनजागृतीचा संकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी केला आहे.

पुणे - रक्तदान करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची रक्तगटनिहाय सूची करणे, कमवा व शिका योजनेतील १२ हजार विद्यार्थ्यांसह स्वयंसेवी विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून फेस मास्क तयार करून वाटप करणे, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात राहणाऱ्यांपैकी दहा कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी दत्तक घेणे, तसेच आवश्यकतेनुसार महाविद्यालयातर्फे सॅनिटायझर तयार करून वितरीत करणे, अशा स्वरूपात मदतकार्य उभे करून कोरोनामुक्ती व जनजागृतीचा संकल्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी विद्यापीठांतर्गत सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी विकास अधिकारी, जिल्हा समन्वयक यांच्याशी टेलिफोनिक कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी हा संकल्प व्यक्त केला.

डॉ. करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन टेलिफोनिक कॉन्फरन्स झाली. त्यात विद्यापीठांतर्गत स्थापन झालेल्या 'एसपीपीयू- एनएसएस कोरोनामुक्ती जागृती समितीचे' सदस्य आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी यात सहभागी झाले होते. या ऑनलाईन सभेत पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील  साडेपाचशे विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांचा सहभागी होता.

स्थानिक प्रशासन आणि प्राचार्यांच्या समन्वयातून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी आपल्या राहत्या जागीच राहून मदत कार्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

श्रमदानातून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने
प्रशासनाच्या नियमांचे पालन करून विविध जागी जास्तीत जास्त सहाय्य उपलब्ध करून देण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थी विकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: student development board of the university fight against coronafree