'कोरोना' विरोधातील लढ्यासाठी प्रस्ताव सादर करा; पुणे विद्यापीठाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन संस्था 'कोरोना'वर संशोधन करत आहेत, त्यांच्याकडे उपचार, मृत्यू कमी करण्यासाठी काही उपाय असतील, किंवा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतींचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करत  आहेत.

पुणे - 'कोरोना'चे निदान असेल किंवा प्रतिबंध यावर संशोधन सुरू असेल, बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कोणाकडे नव संकल्पना असेल तर अशा संस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोन्हेशन इंनक्युबेशन अँड लिंकेज सेंटरशी संपर्क साधावा. त्यांना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास सहकार्य केले जाईल असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर औषध निर्माण करण्यासाठी संशोधन करत आहेत. या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी उपाय शोधत आहेत, पण सध्या तरी यामध्ये अंतीम निष्कर्षावर कोणीही आलेले नाही. "कोरोना' मुळे बाजारपेठेची अवस्था नाजूक झाली आहे, अशा काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी शासन दरबारी नव्या संकल्पना मांडण्यासाठी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमरकर व इंनक्युबेशन सेंटरच्या संचालिका डाॅ. अपूर्वा पालकर यांनी योजना तयार केली आहे.  

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शास्त्रज्ञ, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन संस्था 'कोरोना'वर संशोधन करत आहेत, त्यांच्याकडे उपचार, मृत्यू कमी करण्यासाठी काही उपाय असतील, किंवा प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतींचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करत  आहेत, अशा संस्थां ना शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यास पुणे विद्यापीठ मदत करेल. 

तसेच 'कोरोना'मुळे आपत्ती व्यवस्थापन, लोकांना मदत करणारी यंत्रणा, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो का यावर संस्था किंवा व्यक्तीकडे नव संकल्पना असेल तर त्या विद्यापीठाकडे सादर कराव्यात. त्यांना थेट शासनाकडे सादर करून समाजाची मदत करता येऊ शकेल, असे पालकर यांनी सांगितले. 

हे प्रस्ताव info.iil@unipune.ac.in या वर ईमेल करावा तसेच या ९८५०५०९४५४,९८२३०११७४७ क्रमांकावर वाॅट्सअॅपवर करावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Submit a proposal for a fight against Corona virus; Appeal of University of Pune