स्वदेशी टेस्टींग किटसाठी एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य

  • देशाला ४० लाख पॉलिमर स्वॅबची गरज 
  • स्वदेशी बनावटीचा हा स्वॅब स्पेशालिटी पॉलिमर पासून विकसित 
  • पॉलिस्टर आणि पॉलिप्रोपेलीन पासून रॉड आणि शाफ्ट विकसित 
  • सहज उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्‍य

पॉलिमर स्वॅबची निर्मिती; ‘सी-मेट’च्या शास्त्रज्ञांची कामगिरी 
पुणे - देशात सध्या कोरोनासाठी मोठ्या प्रमाणार ‘टेस्टिंग कीट’ची आवश्‍यकता आहे. जगभरातच कोरोनचे संकट असल्याने ही किट आणि त्यासाठी आवश्‍यक इतर साहित्याचा पुरवठा खंडित झाला आहे. यावर उपाय म्हणून देशभरातील वैज्ञानिक आणि डॉक्‍टर स्वदेशी कीट विकसित करत आहेत. अशा किटमध्ये व्यक्तीच्या स्वॅबचा नमुना घेण्यासाठी आवश्‍यक ‘पॉलिमर स्वॅब’ची निर्मिती करण्यात पुण्यातील संशोधकांना यश आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी (सी-मेट) या संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ‘स्पेशालिटी पॉलिमर’च्या वापरातून हे पॉलिमर स्वॅब विकसित केले आहे. संशोधनात सहभागी असलेले वरिष्ठ पॉलिमर शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘प्रामुख्याने जर्मनी, इटलीतून अशा टेस्टिंग किटची आयात केली जाते. व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना घेण्यासाठी आवश्‍यक पॉलिमर स्वॅबची निर्मिती हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. ही गरज ओळखून पॉलिमर स्वॅब विकसित केला आहे.’’ 

केंद्र सरकारच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राच्या निर्देशानुसार व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना घेण्यासाठी फक्त ’सिंथेटिक फायबर’चा वापर करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने या  ‘पॉलिमर स्वॅब’चे प्रोटोटाईप पुढील चाचण्यांसाठी पाठविण्यात आले आहे. 

कोरोना चाचणीच्या किटच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. वैद्यकीय चाचण्यांनंतर .लवकरच याचे उत्पादन शक्‍य होईल. 
- डॉ. मुनिरत्नम, महासंचालक, सी-मेट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swadeshi testing kit for coronavirus