Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात भाजीपाला विक्रीसाठी 46 ठिकाणे निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी लागू आहे. मात्र, शहरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहरातील बाजाराची ठिकाणे, मंडईत गर्दी करीत आहेत. त्याला आळा बसण्यासाठी व भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यांची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी पाच अशी आहे. शहरातील नेहमीच्या मंडई पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

पहिल्या टप्प्यात सात केंद्र सुरू; अन्य ठिकाणी टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी 
पिंपरी - शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागांवर प्राथमिक स्तरावर किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शहरातील 46 ठिकाणे प्रस्तावित केली असून पहिल्या टप्प्यात सात ठिकाणांवर भाजीपाला व फळे विक्री केंद्र गुरुवारपासून सुरू झाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. संचारबंदी लागू आहे. मात्र, शहरातील दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहरातील बाजाराची ठिकाणे, मंडईत गर्दी करीत आहेत. त्याला आळा बसण्यासाठी व भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक प्रभागातील मोकळ्या जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यांची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी पाच अशी आहे. शहरातील नेहमीच्या मंडई पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. 

पहिल्या टप्प्यातील केंद्र 
पहिल्या टप्प्यात निगडी- प्राधिकरणातील नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, रावेतमधील डी-मार्ट शेजारील भूखंड, भोसरीतील गावजत्रा मैदान, नेहरूनगरचे अण्णासाहेब मगर स्टेडीयम, चिखली पुर्णानगरमधील सीडीसी ग्राऊंड, थेरगाव- वनदेवनगरमधील सर्व्हे क्रमांक 628 आणि सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर गुरुवारपासून भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, मगर स्टेडियमऐवजी नेहरूनगर येथीलच पॉलिग्रास हॉकी मैदानावर केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे काही ग्राहकांचा गोंधळ उडाला. मैदानाबाहेर उभ्या हातगाडींवरून खरेदी करताना सोशल डिस्टंसिंग पाळले गेले नाही. 

संभाव्य केंद्र 
सम्राट चौक मोरवाडी, आकुर्डी रुग्णालयाशेजारील मैदान, बहिरवाडे क्रिडांगण, सिद्धिविनायक मंदिर, काका हलवाई स्वीट शेजारील मोकळी जागा, ब प्रभाग कार्यालयाशेजारील जागा, मुकाई चौक, केशवनगर चिंचवड, मोरया हास्पिटल शेजारील जागा, वाल्हेकरवाडी पोलिस चौकीशेजारील भूखंड, जाधववाडी मंडई शेजारी, रिव्हर रेसिडेन्सीजवळ मोशी, श्‍याम अगरवाल प्लॉट इंद्रायणीनगर, जलवायूविहार भूखंड, मासूळकर कॉलनी मंडई, पिंपळे गुरव महापालिका शाला मैदान, कुणाल आयकॉन रोड, ऍम्बिअन्स हॉटेल, पिंपळे निलख गायरान, इंदिरा कॉलेज मैदान ताथवडे, मोशी देवस्थान भंडारा जागा, गव्हाणे मैदान, दिघी मराठी शाळा, एसपीजी शाळा आळंदी रोड, ठाकरे शाळा त्रिवेणीनगर, कृष्णानगर चौक, पवळे विद्यालय यमुनानगर, अण्णाभाऊ साठे अभ्यासिका, सेक्‍टर 22 पवळे विद्यालय, नव महाराष्ट्र शाळा मैदान, जयहिंद स्कूल पिंपरी, रहाटणी शाळा मैदान, सितांगण गार्डन, गजानन महाराज मंदिरासमोरील जागा सांगवी, विहाराजवळील गार्डन आरक्षण दापोडी. येथे टप्प्याटप्प्याने भाजीपाला विक्री केंद्र सुरू होतील. 

असे असेल नियोजन 
- सॅनिटायझरचा वापर करूनच ग्राहकांना प्रवेश 
- ग्राहकांना येण्या-जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग 
- ग्राहकांना सोशल डिस्टंसिंग पाळणे अनिवार्य 
- गर्दी झाल्यास सोशल डिस्टसिंगनुसार प्रतिक्षालय 
- ग्राहकांचे तापमान तपासणीसाठी इन्फारेड थरमल गन 
- प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी एक अधिकारी नियुक्त


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 46 places for sale of vegetables in Pimpri Chinchwad city