रात्रीचा दिवस करीत ते देताहेत अत्यावश्‍यक सेवा

They are providing Essential services by working day and night during lockdown due to corona virus
They are providing Essential services by working day and night during lockdown due to corona virus

पुणे : वह शक्ती हमें दो दयानिधे
कर्तव्य मार्ग पर डट जावे
पर सेवा पर उपकार में हम
जगजीवन सफल बना जावे

...एकीकडे मनामनाने कोरोनाचा धसका घेतला आहे, तर दुसरीकडे स्वतःचा जीव डावावर मांडत अत्यावश्‍यक सेवा बजवणारे कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. आपल्या घरादाराची चिंता सोडून घराघरांत आशेचे दीप तेवत ठेवणाऱ्या या योद्ध्यांमुळे शहरभर या प्रार्थनेची प्रचिती येत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाखो लोक घरात असताना देखील जनजीवन सुरळीत आहे. कारण, अत्यावश्यक सेवेतील हजारो हात रात्रीचा दिवस करून राबत आहेत. तेही जीव धोक्यात घालून. पोलिस, परिचारक, डॉक्टर, अग्निशामक दल, महावितरण, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, मोबाईल टॉवर टेक्निशियन, कचरावेचक, सिलिंडर डिलिव्हरी बॉय, भाजीविक्रेते, औषध विक्रेते आदी या धोक्याच्या काळात जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यामुळे नागरिक घरात निश्चिंत आहेत

...म्हणून येताहेत शिवभोजन मिळविण्यात अडचणी
सध्या जनजीवन सुरळीत राहण्यामागे मोबाईलवरील संवादाचा मोठा वाटा आहे. यासाठी विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क सुरळीत ठेवण्यासाठी मोबाईल टॉवर दुरूस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वर्ग मोठा आहे. जर मोबाईल नेटवर्क डाऊन झाले, तर सगळे विस्कळित होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी महावितरणचे कर्मचारी झटत आहेत. त्याचबरोबर सर्वांच्या आरोग्यासाठी लोक घरात असले, तरी रस्ते चकाचक होत आहेत. तसेच, प्रत्येकाच्या घरातील कचरादेखील नियमित उचलला जात आहे. त्यासाठी सफाई कामगार पहाटेपासून राबत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासू नये, याकरिता भाजी व किराणा विक्रेते झटत आहेत. ते व्यवसाय करत असले, तरी ते सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहेत.

''कोरोनामुळे लॉकडाउन असले तरी आमचे काम थांबत नाही. आमचे काम चोवीस तास सुरू असते. मोबाईल नेटवर्कची सेवा खंडीत होऊ नये, याची आम्ही काळजी घेतो. सरकारने आमच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात.''
-महेश घोडके, मोबाईल टॉवर टेक्निशियन

''मी महापालिकेतर्फे स्वच्छ संस्थेअंतर्गत कचरा उचलण्याचे काम करतो. सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत मी २७० घरांतील कचरा उचलतो.''
- सुनील सरनाईक, कचरा वेचक

''उन्हाळ्यात तापमान अधिक असल्याने ट्रान्सफॉर्मर, भूमिगत केबलमध्ये फॉल्ट होण्याची सर्वाधिक शक्यता असते; परंतु, फॉल्ट निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जर एखाद्या ठिकाणी फॉल्ट निर्माण झाला तर तत्काळ दुरूस्ती करण्यावर आमचा भर आहे.''
-एकनाथ शेळके, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com