Coronavirus : त्या तिघांना आज घरी सोडणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोना संसर्ग झाल्याने महापालिकेच्या वायसी एम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तिघांच्या १४ दिवसांचा कालावधी बुधवारी पूर्ण झाला. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एन आय व्हि लॅब मध्ये सलग दोन दिवस तपासण्यात आले. ते निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. हे तिघे जन सर्वात अगोदर कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

पिंपरी - कोरोना संसर्ग झाल्याने महापालिकेच्या वायसी एम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या तिघांच्या १४ दिवसांचा कालावधी बुधवारी पूर्ण झाला. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील एन आय व्हि लॅब मध्ये सलग दोन दिवस तपासण्यात आले. ते निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. हे तिघे जन सर्वात अगोदर कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, महापालिकेच्या वाय सीएम व भोसरी रुग्णालयात कोरोंना संशयितांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या घशातील नमुने पुण्यातील एन आय व्ही लॅबमध्ये तपासणी साठी पाठविले जात आहेत. १२ मार्च रोजी दाखल झालेल्या तीन जणांचा १४ दिवसांचा विलागीकरण कालावधी बुधवारी पूर्ण झाला. त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचा अहवाल रात्री उशिरा मिळाला. ते सर्व निगेटीव्ह आहेत. गुरुवारी (ता. २६) पुन्हा नमुने घेवून तपासणी साठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवालही निगेटीव्ह आला त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे संसर्ग झालेल्यांची संख्या केवळ नऊ राहील. शहराच्या दृष्टीने ही बाब दिलासा दायक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They will leave the house today by coronavirus affected