पुण्यात दिवसभरात तीन जणांचा मृत्यू; ३८ जणांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

कोरोनाची लागण झालेल्या आणखी तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या मृतांची संख्या २८ झाली आहे. मृतांमध्ये ३० वर्षांच्या तरूणाचा समावेश आहे.  दरम्यान, दिवसभरात शहरातील विविध भागांतील ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यात कोरोनाचे २१९ रुग्ण आहेत.

पुणे - कोरोनाची लागण झालेल्या आणखी तिघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या मृतांची संख्या २८ झाली आहे. मृतांमध्ये ३० वर्षांच्या तरूणाचा समावेश आहे.  दरम्यान, दिवसभरात शहरातील विविध भागांतील ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यात कोरोनाचे २१९ रुग्ण आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयांतील कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये भवानी पेठेतील ५५ वर्षांच्या महिलेचा समावेश असून, त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना १ एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. याच पेठेतील ६९ वर्षांच्या महिलेचाही मृत्यू झाला आहे. 

त्यांना सात एप्रिलला रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील ३० वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाला असून, पाच एप्रिलपासून तो रुग्णालयात होता. शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. या तिघांना अन्य आजारही होते.

शहराच्या विविध भागांतील नागरिकांची आरोग्य तपासणी करून, गरजेनुसार त्यांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे, अशा लोकांना लगेचच रुग्णालयांत नेले जात असल्याचे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन नवीन पॉझिटिव्ह
पिंपरी - कोरोना संशयित म्हणून गुरुवारी घेतलेल्या चाळीसपैकी तीन जणांचे अहवाल शुक्रवारी (ता. १०) पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २६ झाली आहे.

शहरातील पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या गेल्या पाच दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. चार एप्रिल रोजी रात्री पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे उपचार घेत असलेल्यांची संख्या आठ झाली होती. तर, बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या बारा आहे. मात्र, गेल्या ७२ तासांत तब्बल सहा जण पॉझिटिव्ह पान ७ वर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three death in one day at pune and 38 new positive patient found