Lockdown : अपुऱ्या वेळेमुळे नागरिकांची कसरत 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

प्रशासनाने दिलेली ही वेळ अपुरी ठरत असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले.

पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात लॉकडाउन लागू केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी शहरासह उपनगरांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेतच भाजीपाला, किराणा मालाची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. परंतु, प्रशासनाने दिलेली ही वेळ अपुरी ठरत असल्याने एकाच वेळी मोठी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील "हॉटस्पॉट' असलेल्या परिसरासह सर्वच भागात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही दोन तासांची वेळ अतिशय कमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे असले, तरी काही नागरिक मात्र, एवढा वेळ पुरेसा असल्याचे सांगत आहेत. गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी काही पर्यायही सुचविले आहेत. त्यानुसार सकाळी दोन तास तर सायंकाळी दोन तास वेळ ठेवा किंवा सकाळच्या वेळेत आणखी थोडी वाढ करा, अशा सूचना नागरिकांनी केल्या आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हडपसर 
- खरेदीची वेळ वाढवण्याची नागरिकांची मागणी 
- खरेदीसाठी दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड 
- सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र 

घोरपडी 
- बी. टी. कवडे, घोरपडी गाव, वानवडीत खरेदीसाठी मोठी गर्दी 
- दोन तासांचा वेळ नागरिकांना खरेदीसाठी पडतोय अपुरा 
- दुकान उघडणे आणि साहित्य मांडण्यातच दुकानदारांचा अर्धा तास 
- साडेअकरा वाजल्यापासून पोलिसांची दुकान बंद करण्याची सूचना सुरू 
- वेळेत विक्री न झाल्याने भाजी शिल्लक राहून विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान 

येरवडा 
- येरवडा भाजी मंडई बुधवारपासून बंद 
- येरवडा गावठाण, चित्रा चौक, गाडीतळ परिसर सील 
- किराणा दुकानेच न उघडल्याने नागरिकांची गैरसोय 
- काही वसाहतींमध्ये थेट शेतकऱ्यांकडून भाज्या व फळांची विक्री 
- खरेदीसाठी वेळ कमी असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया 
- पीठ गिरण्यांमध्ये दोन तासांत धान्य दळून मिळणे अवघड 
- दूध व्यावसायिकांकडून वेळेत बदल करण्याची मागणी 

मुंढवा 
- खरेदीसाठी वेळ पुरत नसल्याची नागरिकांची तक्रार 
- मुंढवा, केशवनगर परिसरातील नागरिकांना किराणा माल मिळण्यात अडचणी 
- दुचाकी वापरावर बंदी असल्याने लांबून वस्तू आणणेही अवघड 
- विक्रीसाठी दोनच तास असल्याने विक्रेत्यांचा माल शिल्लक राहतो 
- दूध विक्रीसाठी सायंकाळी दोन तास देण्याची विक्रेत्यांची मागणी 

बाणेर, बालेवाडी 
- बाणेर, बालेवाडी परिसरात एकाच वेळी नागरिक बाहेर 
- रस्त्यावर गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंग वाऱ्यावर 
- खरेदीसाठी दुकानांपुढे मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र 

सिंहगड रस्ता 
- नागरिक, दुकानदारांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही 
- काही दुकाने सकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास उघडतात 
- सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची खरेदीसाठी गर्दी 
- दुकानदारांकडून जादा भावाने मालाची विक्री 
- तंबाखू, सिगारेट आदींची छुप्या पद्धतीने विक्री 

गोखलेनगर 
- गोखलेनगर, जनवाडी भागात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड 
- नागरिकांकडून गरजेपेक्षा जास्त वस्तूंची खरेदी 
- परिसरात दूध, चिकन, फळांची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र 

किराणा दुकानात खरेदीसाठी नंबर लावावा लागतो. दुकानात हव्या त्या वस्तूंचा तुटवडा असतो. त्यामुळे दुकानामध्ये पुरेसा माल कसा उपलब्ध होईल, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. 
- सविता भावे, गृहिणी, हडपसर 

दररोज बाणेर, बालेवाडी भागात दूध देण्यासाठी येतो. प्रशासनाने दिलेला दोन तासांचा वेळ पुरेसा असला तरी फक्त दूध वितरणासाठी ही वेळ सकाळी सात ते नऊ अशी करावी. 
अतुल ओझरकर, दुग्ध व्यावसायिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time given by the administration is insufficient in lockdown