कोरोनाविषयी शंका आहे? मोबाईल ऍप वापरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मंगळवारी (ता. 24) "पीसीएमसी स्मार्ट सारथी' मोबाईल ऍप नागरिकांच्या सेवेसाठी आणले आहे.

पिंपरी - कोरोनाबाबत नागरिकांच्या विविध शंकांचे निरसण व्हावे, आजाराची लक्षणे काय आहेत? त्याकरीता काळजी कशी घ्यावी, जिल्हाधिकारी कार्यालय व सरकारच्या सूचना आदी माहिती नागरिकांना व्हावी, यादृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मंगळवारी (ता. 24) "पीसीएमसी स्मार्ट सारथी' मोबाईल ऍप नागरिकांच्या सेवेसाठी आणले आहे. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवरून एन्ड्राईड मोबाईलधारकांसाठी डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे ऍपल युजर्सकरीता हे ऍप उपलब्ध आहे.

ऍप डाऊनलोड करण्यासाठी PCMC Smart Sarathi या नावाने सर्च करावे. ऍप डाऊनलोड केल्यानंतर ऍपवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) करून त्याचा वापर करता येईल. ऍपद्वारे कोरोनोबाबत चेकलिस्ट उपलब्ध केली आहे. चेकलिस्टद्वारे विषाणूच्या लक्षणाबाबत एकूण 13 प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. यामुळे सदर नागरिकांची आरोग्यविषयक संपूर्ण माहिती उपलब्ध होणार असून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी अशा नागरिकांशी व्यक्तीश: संपर्क साधून उपचाराबाबत पुढील कार्यवाही करतील. 

गुगल प्लेद्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use the mobile app for Doubt about Corona