ग्रामीण भागावरही आता ड्रोनद्वारे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

ड्रोनमुळे एकाचवेळी पाच किलोमीटर परिसरावर देखरेख करता येते. पुणे जिल्ह्यातील सर्वच मोठ्या गावांत हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लॉकडाउनवर आता ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. शिरूर तालुक्‍यातील वडगाव रासाई येथून शनिवारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार यांनी पुढाकार घेतला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील मोठ्या आणि आठवडे बाजार भरत असलेल्या गावांमधील लॉकडाउनवर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना अधिकार दिले आहेत. ग्रामपंचायतींमार्फत पोलिसांना आवश्‍यक ती मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

आजपासून पहिल्या टप्प्यात हवेली तालुक्‍यातील मांजरी, वाघोली येथे तर शिरूर तालुक्‍यातील वडगाव रासाई येथे हा उपक्रम सुरू करण्यात आला. सुजाता पवार यांनी त्यांच्या जिल्हा परिषद गटातील सर्वच्या सर्व १४ गावांमध्ये हा उपक्रम सुरू 
केला आहे. 

या १४ पैकी १२ गावांच्या सरपंच महिला आहेत. ही सर्वच गावे लॉकडाउनला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे सुजाता पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Watch on rural area by drone