अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाशी समन्वय ठेवू - आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

पिंपरी शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधला जाईल. त्याद्वारे, अडचणी सोडविल्या जातील, " असे आश्वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी - 'शहरातील अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधला जाईल. त्याद्वारे, अडचणी सोडविल्या जातील, " असे आश्वासन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फेडरेशन ऑफ असोसिएशन्स आॅफ पिंपरी चिंचवड मधील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या ७ ते ८ संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलताना हर्डीकर यांनी वरील आश्वासन दिले. 

अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, फेडरेशन व हॉटेल असोसिएशनचे कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, किराणा माल घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्याम मेघराजानी,  गॅस वितरक संघटनेचे शिवाजी ढमाळ, पॅकेजिंग इंडस्ट्रीजचे गंगाराम पटेल, वाहतूक संघटनेचे काळुराम गायकवाड, आैषधे विक्रेता संघटनेचे महेश खिंवसरा आदी यावेळी उपस्थित होते. 

पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक परवाने देताना विलंब केला जातो, असे संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी निदर्शनास आणून दिले. 

यावेळी, आरोग्य, वैद्यकीय विभागाचे डॉक्टर्स, परिचारिका व इतर निमवैद्यकीय कर्मचारी वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा ठरावही मांडण्यात आला. त्याला, सर्व प्रतिनिधींनी अनुमोदन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will coordinate with the government to ensure essential services shravan hardikar