विंडसर व डिक्की यांचा बेघर, गरजूंना मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

लॉकडाऊनचा हातावर पोट असणारे मजूर, रस्त्यावर राहणारी कुटुंब आणि मुले, पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला. त्यासाठी डिक्की  व विंडसर या संस्थेने पुढाकार घेऊन त्यांना मदत केली.

पुणे - लॉकडाऊनचा हातावर पोट असणारे मजूर, रस्त्यावर राहणारी कुटुंब आणि मुले, पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसला. त्यासाठी डिक्की (दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडस्ट्री) व विंडसर या संस्थेने पुढाकार घेऊन त्यांना मदत केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नागरिकांसह विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी "डिक्की'च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मजूर, बेघर व गरजूंना जेवणाच्या व्यवस्थेसाठी उद्योगपती राजेश बाहेती व पुण्यातील बांधकाम संस्था "विंडसर शेल्टर्स'चे संचालक महेश राठी यांनी पुढाकार घेतला. तसेच, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रशासनाबरोबर चर्चा करून "सीओईपी'तर्फे "कम्युनिटी किचन'ची व्यवस्था केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

27 मार्चपासून शेल्टर्समधील लोकांना सकाळचा नाश्‍ता व दोन वेळेचे जेवण देण्यात आले. तसेच ससून हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांना शासकीय विश्रामगृहात सकाळचा नाश्‍ता व दोन वेळेच जेवण देण्यात येत आहे. पोलिसांसाठीही "सीओईपी'मध्ये नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था केली आहे. किचन व्यवस्था राजेश बाहेती मित्र परिवार आणि विंडसर शेल्टर्सतर्फे सपना राठी व त्यांच्या टीमने घेतलेली आहे. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेशनकिटच्या वितरणाची जबाबदारी मैत्रेयी कांबळे, कौस्तुभ होवाळे व पॅकिंग अनिल होवाळे, राजू साळवे या युवा उद्योजकांनी घेतलेली आहे. गरीब व गरजूंना आठवडाभर पुरेल इतकी डाळ, तांदूळ, पीठ, मीठ व मसाला असे साहित्य देण्यात येत आहे. आजपर्यंत सात हजारांपेक्षा जास्त किट व 45 हजारांपेक्षा जास्त लोकांना जेवणाचे वाटप केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Windsor Shelters and Dikki helping to the homeless

Tags
टॉपिकस
Topic Tags: