सोशल मीडियावर "कोरोना गो.. गो करोनाचा' फिव्हर! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 मार्च 2020

जळगाव  : जगभरात "कोरोना व्हायरस'मुळे सर्वत्र दहशत निर्माण झाली असून, आतापर्यंत सात हजारांवर लोक मृत्युमुखी पडले आहेत; तर 80 हजार रुग्ण "कोरोना' आजाराने बरे झाले आहेत. "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध हास्यविनोदाच्या पोस्ट "व्हायरल' होऊ लागल्या आहेत. त्यात मंत्री रामदास आठवले यांच्या "कोरोना गो गो करोना' हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात "व्हायरल' होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आज काय नवीन पोस्ट आली काय? यावर लोकांचे लक्ष लागून आहे. "कोरोना विषाणू'ची नागरिकांच्या मनात भीती असली, तरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होऊन भीती पळवली जात आहे. 

"कोरोना व्हायरस'च्या घडामोडींचे व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर रोज विविध हास्यविनोद पोस्ट, गाणी, टिकटॉकचे व्हिडिओ, कविता, गाणीसुद्धा "व्हायरल' होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोबाईलवरही कॉलर ट्यूनवर "कोरोना'बाबत माहिती प्रसारित करण्यात येत आहे. 

आठवलेंचा "गो कोरोना' फिव्हर 
"कोरोना'च्या अफवांमुळे चिकन स्वस्त झाले असून, काही जण चिकन मोठ्या प्रमाणात सेवन करीत आहेत. त्यामुळे "कोरोना' होण्यापूर्वीच मूळव्याध होण्याचा धोका, असा व्हिडिओ "व्हायरल' झाला आहे; तर "एकसुद्धा पत्रकार कोरोनाबाधित रुग्णाला विचारायला गेला नाही', "कोरोनाचा राग बिचाऱ्या कोंबडीवर का... एक भडकलेला पोल्ट्रीमालक' आणि मंत्री रामदास आठवले यांच्या "करोना गो गो करोना' या व्हिडिओने तर सोशल मीडियावर अक्षरशः: हंगामाच केला आहे. त्यात टिकटॉकची भर पडल्याने वेगवेगळ्या व्हिडिओवर "करोना गो'चाच वापर केल्याने संसर्गजन्य आजाराच्या वातावरणातही नागरिकांमध्ये हास्यकल्लोळ होताना दिसत आहे. 

मास्क 200, तर कोंबडी 20 रुपये 
चिकनमुळे "कोरोना' होत असेल तर एक महिला कच्चे चिकन खात असल्याचा व्हिडिओही "व्हायरल' झाला आहे; तर 20 रुपयांचा मास्क आता 200 रुपयांना आणि 200 रुपयांची कोंबडी आता 20 रुपयांना या "व्हायरल' पोस्टनेही सोशल मीडियावर चांगलीच दाद मिळविलेली दिसत आहे. 

अफवांवर विश्‍वास ठेवू नका 
"कोरोना'पासून सावधगिरी बाळगण्यासाठी हात स्वच्छ धुवा, मास्क वापरा, अशा आशयाच्या पोस्टसुद्धा "व्हायरल' करून जनजागृती होत असली, तरी भीती निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Corona Go .. Go Corona's 'Fever!' On social media.