esakal | आनंदाची वार्ता...जळगावातील पहिला रुग्ण अखेर झाला "कोरोना'मुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाची वार्ता...जळगावातील पहिला रुग्ण अखेर झाला "कोरोना'मुक्त 

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यापैकी दुसऱ्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता पहिला रुग्ण "कोरोना'मुक्‍त झाल्याने जळगाव जिल्ह्याचा "ग्रीन झोन'मध्ये समावेश होऊन जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आनंदाची वार्ता...जळगावातील पहिला रुग्ण अखेर झाला "कोरोना'मुक्त 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव :  शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. मात्र, या संशयितावर पंधरा दिवस उपचार केल्यानंतर मंगळवारी त्याचा दुसरा अहवालही "निगेटिव्ह' आल्याने तो "कोरोना'मुक्त झाला आहे. दरम्यान आज  या रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे जळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

संबंधित पहिला संशयित हा 28 मार्चपासून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार घेत होता. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा पहिला अहवाल सोमवारी (ता. 13) निगेटिव्ह आला होता. दरम्यान, त्याचा दुसरा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झाला असून, तो "निगेटिव्ह' आला आहे. त्यामुळे हा रुग्ण "कोरोना'मुक्त झाला असून, त्याला आज  (ता. 15) घरी सोडण्यात येणार आहे. 


जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यापैकी दुसऱ्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता पहिला रुग्ण "कोरोना'मुक्‍त झाल्याने जळगाव जिल्ह्याचा "ग्रीन झोन'मध्ये समावेश होऊन जळगावकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या रुग्णाला चौदा दिवस घरीच निगराणीत ठेवण्यात येणार आहे. 
 

loading image