World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाची सलग तिसरी त्रिशतकी धावसंख्या

वृत्तसंस्था
Saturday, 15 June 2019

वर्ल्ड कप 2019 : 

लंडन : भारताकडून पराभवाचा धक्का सहन केल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपली गाडी रुळावर आणली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात त्यांनी त्रिशतकी मजल मारली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध आज प्रथम फलंदाजी करताना 334 धावा उभ्या केल्या कर्णधार ऍरॉन फिन्चचे दीडशतक वैशिष्ठपूर्ण ठरले. 

वर्ल्ड कप 2019 : 

लंडन : भारताकडून पराभवाचा धक्का सहन केल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपली गाडी रुळावर आणली आहे. सलग तिसऱ्या सामन्यात त्यांनी त्रिशतकी मजल मारली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरूद्ध आज प्रथम फलंदाजी करताना 334 धावा उभ्या केल्या कर्णधार ऍरॉन फिन्चचे दीडशतक वैशिष्ठपूर्ण ठरले. 

गेल्या रविवारी भारताकडून पराभव झाला असला तरी ऑस्ट्रेलियाने 316 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध 307 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने शतकी खेळी केली होती तर आज फिन्चने 153 धावा केल्या. स्टिव स्मिथनेही 73 धावांचे योगदान दिले त्यामुळे ऑस्ट्रेलिया तिनशे धावा पार करणे कठिण झाले नाही. श्रीलंकेने नाणेफेकून जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला पण त्याला ते न्याय देऊ शकले नाहीत. अखेरच्या 10 षटकांत पाच फलंदाज बाद केले परंतु त्यातील दोन धावचीतचे होते. धनंजय डिसिल्वा या फिरकी गोलंदाजाने दोन विकेट मिळवले.  खेळपट्टीवर काहीसे हिरवे गवत आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना सहाय्य करणारी दिसत असली तरी फिन्चने श्रीलंकेची सर्व गणिते बिघडवली.

पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातील शतकवीर वॉर्नर मात्र आज लय हरपल्याप्रमाणे खेळत होता. मुळात 26 धावांसाठी त्याने 48 चेंडू घेतले आणि त्यातील दोनच चेंडूंना तो सीमारेषेवर धाडू शकला. त्यानंतर उस्माव ख्वाजा बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने शंभरी गाठली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची सरासरी पाचच्या आसपास होती, परंतु स्टीव स्मिथ मैदानात आला आणि वेग वाढवला दुसऱ्या बाजूला फिन्चनेही आक्रमक पवित्रा घेतला या दोघांनी 19 षटकांत 173 धावांची भागीदारी केली. 
40 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 237 धावा झाल्या होत्या. अखेरच्या दहा षटकांत 94 धावांचा पाऊस पडला त्यात फिन्चचे दीडशतक, स्मिथच्या 73 धावा आणि ग्लेन मॅक्‍सवेलचा 25 चेंडूतील 46 धावांचा तडाखा मोलाचा ठरला. स्मिथचे तर विश्‍वकरंडक स्पर्धेतील आपल्या 10 डावातील हे आठवे अर्धशतक आहे. 

संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया ः 50 षटकांत 7 बाद 334 (ऍरॉन फिन्च 153 -132 चेंडू, 15 चौकार, 5 षटकार, स्टीव स्मिथ 73 -59 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, ग्लेन मॅक्‍सवेल 46 -25 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, इसरू उधाना 10-0-57-2, धनंजय डिसिल्वा 8-0-40-2) 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia finishes with 334 runs against Sri Lanka