विश्वविक्रमी धावसंख्या करत इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर विजय

वृत्तसंस्था
Wednesday, 20 June 2018

नॉटिंगहॅम : मायदेशातील आगामी विश्वकरंडकाचे यजमान असलेल्या इंग्लंडने वन-डे क्रिकेटमध्ये 481 ही विश्वविक्रमी धावसंख्या उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा 242 धावांनी पराभव केला.

विशेष म्हणजे इंग्लंडने विद्यमान विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ही धावसंख्या उभारली. ट्रेंटब्रीजवर इंग्लंडने 6 बाद 481 अशी घोडदौड केली. विशेष म्हणजे याआधीचा उच्चांक इंग्लंडचाच होता. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध त्यांनी 3 बाद 444 धावा केल्या होत्या. योगायोग म्हणजे याच मैदानावर इंग्लंडने नवा उच्चांक प्रस्थापित केला. इंग्लंडने 46व्या षटकातच हा उच्चांक मोडला.

इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टॉ आणि ऍलेक्‍स हेल्स यांनी शतके झळकाविली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्य्रू टायी याने 'शतक' पूर्ण केले. ढगाळ हवामानात गोलंदाजांना फायदा होईल या हेतूने ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने नाणेफेकीनंतर इंग्लंडला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. पण, इंग्लंडच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत धावांचा डोंगर रचला.

या धावसंख्येपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाचा संघ 239 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीद यांच्या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड : 50 षटकांत 6 बाद 481 (जॅसन रॉय 82-61 चेंडू, 7 चौकार, 4 षटकार, जॉनी बेअरस्टॉ 139-92 चेंडू, 15 चौकार, 5 षटकार, ऍलेक्‍स हेल्स 147-92 चेंडू, 16 चौकार, 5 षटकार, इऑन मॉर्गन 67-30 चेंडू, 3 चौकार, 6 षटकार, झाय रिचर्डसन 10-1-92-3, अँड्य्रू टायी 9-0-100-0) विजयी वि. ऑस्ट्रेलिया सर्वबाद 239 (मार्कस स्टॉयनिस 44, आदिल रशीद 4-47, मोईन अली 3-28)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England make World record in one-day cricket beat Australia