स्विंग नाही; पण बाऊन्स मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 January 2018

सेंच्युरियन - पहिली कसोटी गमाविल्यानंतर भारतीय संघात निराशेचे वातावरण होते. दुसऱ्या कसोटीसाठी सेंच्युरियनची खेळपट्टी अधिक वेगवान आणि बाऊन्सी असण्याचे संकेत मिळत आहेत. यजमान संघाच्या वेगवान माऱ्याला तोंड देण्यासाठी फलंदाजीची फळी भक्कम असणे आवश्‍यक असून, त्या दृष्टीने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात फलंदाजीच्या आघाडीवर एखादा बदल होऊ शकतो, अशीच येथे चर्चा आहे. 

भारतीय खेळाडूंनी आज सेंच्युरियन मैदानावर आल्यावर तीन तास कसून सराव केला. त्याचबरोबर आळीपाळीने सगळे भारतीय फलंदाज विकेटवर जाऊन खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होते. खेळपट्टी बनवणाऱ्या ग्राउंड्‌समनची भेट घेतल्यावर त्याने खेळपट्टीवर केप टाउनपेक्षा अधिक बाऊन्स असेल, असे सांगितले. तो म्हणाला, "येथे चेंडू खूप स्विंग होणार नाही; पण बाऊन्स मात्र अधिक मिळेल. या खेळपट्टीवर मॉर्ने मॉर्केल हा फिलॅंडरपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतो. सामना तीन दिवसांत संपले इतकी गोलंदाजांच्या आहारी जाणारी खेळपट्टी नक्की बनवणार नाही.'' भारतीय संघाच्या सरावानंतर बुमराने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, "कसोटी संघात जागा मिळवणे माझ्यासाठी अभिमानाचे होते. दक्षिण आफ्रिकेतील विकेट्‌सवर गोलंदाजी करताना काय काळजी घ्यायची त्याचा मी अभ्यास करत होतो. विकेट कसे आहे, समोरच्या संघात कोण आहे.. याचा अतिरेकी विचार करून मनात गोंधळ निर्माण करणे मला आवडत नाही. त्यापेक्षा माझ्या बलस्थानांचा विचार करून सामन्यात गोलंदाजी करणे मी पसंत करतो. माझ्या यॉर्कर टाकण्याबद्दल बोलले जाते; पण मी कला कुणाकडून शिकलो नाही, तर मेहनत करून ती आत्मसात केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर आता मला थोडा अनुभव आला आहे, त्याचा वापर करून सुधारित कामगिरी मला करायची आहे. 

पहिल्या सामन्यातील संघात फार काही बदल होतील, असे वाटत नाही. सलामीच्या जोडीत फार तर बदल होऊ शकतो. असा विचार झाल्यास शिखर धवनऐवजी लोकेश राहुलला संधी मिळू शकते. रोहित शर्माला आणखी एक संधी मिळू शकते. त्यामुळे आज तरी रहाणेच्या समावेशाचा चर्चा संघ व्यवस्थापनामध्ये नव्हती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news cricket indian cricket team test match