मुंबईतही आज चौकार-षटकारांचे वादळ? 

वृत्तसंस्था
Saturday, 23 December 2017

मुंबई : इंदूरच्या होळकर मैदानावर शुक्रवारी तुफानी टोलेबाजी झाल्यानंतर आता मुंबईकरही अशाच धमाकेदार फटकेबाजीची वाट पाहत आहेत. भारत-श्रीलंका यांच्यातील अखेरचा तिसरा टी-20 सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारताने अगोदरच मालिका जिंकलेली असल्यामुळे "व्हाइटवॉश'साठी त्यांचे प्रयत्न असतील. 

मुंबई : इंदूरच्या होळकर मैदानावर शुक्रवारी तुफानी टोलेबाजी झाल्यानंतर आता मुंबईकरही अशाच धमाकेदार फटकेबाजीची वाट पाहत आहेत. भारत-श्रीलंका यांच्यातील अखेरचा तिसरा टी-20 सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. भारताने अगोदरच मालिका जिंकलेली असल्यामुळे "व्हाइटवॉश'साठी त्यांचे प्रयत्न असतील. 

नवदांपत्य "विरुष्का' यांचा सोमवारी मुंबईत स्वागत समारंभ आहे. विराटच्या अनुपस्थितीत एकदिवसीय आणि आता टी-20 मालिका विजेतेपदाची भेट "टीम इंडिया' या समारंभात देण्यास सज्ज झाली आहे. नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या रोहित शर्माने अगोदर एकदिवसीय सामन्यात आणि काल टी-20 सामन्यात चौकार-षटकारांचे वादळ आणले होते. उद्या घरच्या मैदानावर आणखी एक स्फोटक खेळी करण्यासाठी रोहित सज्ज झाला आहे. फलंदाजीत रोहित आणि गोलंदाजीत चहल-कुलदीप यांचे कोडे सोडवण्यात श्रीलंकेचा संघ अपयशी ठरला आहे.

इंदूरला भारताच्या भल्यामोठ्या धावसंख्येवर श्रीलंकेने चांगली सुरवात केली होती; परंतु चहल आणि कुलदीप यांनी एकेका षटकात प्रत्येकी तीन बळी मिळवून श्रीलंकेचा खेळ खल्लास केला होता. विशाखापट्टणम येथे तर त्यांना या जोडीने निरुत्तरच केले होते. त्यामुळे उद्याचाही सामना अपवाद नसेल. म्हणूनच भारताकडून "व्हाइटवॉश'चीच शक्‍यता अधिक आहे. 

बुमराऐवजी सिराज? 
मालिका जिंकलेली असल्यामुळे आणि बुमरा दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या संघात असल्यामुळे उद्या त्याला विश्रांती देऊन महंमद सिराजला संधी दिली जाऊ शकते. त्याचप्रमाणे बसील थम्पी, दीपक हुडा यांचाही विचार होऊ शकतो. दिनेश कार्तिकला फलंदाजीची पुरेशी संधी न मिळाल्यामुळे त्याला उद्या क्रमवारीत बढती दिली जाऊ शकते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news national sports mumbai news