नाशिकला डिसेंबरमध्ये महाराष्ट्र-सौराष्ट्र लढत,सत्यजीत बच्छावला संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 November 2018

 

 

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्यातर्फे सध्या सुरू असलेल्या रणजी स्पर्धेंतर्गत महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र यांच्यातील सामना नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. येत्या 14 ते 17 डिसेंबर दरम्यान हा सामना खेळविला जाणार आहे. म
हाराष्ट्र संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज सत्यजित बच्छाव याला घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करण्याची संधी उपलब्ध राहील. नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयचे पश्‍चिम विभागाचे ग्राउंड क्‍युरेटर रमेश म्हामूनकर यांनी शनिवारी (ता.24) सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची पाहणी केली. त्यांनी मैदानाच्या हिरवळीवर समाधान व्यक्त केले, तसेच खेळपट्टी चांगली असून सामन्याच्या तयारीसाठी विविध सूचना केल्या. सामन्यासाठी आवश्‍यक साधनसामुग्री , रोलर्स, ग्रास कटिंग मशीन व इतर साहित्याबाबत माहिती घेतली. तसेच खेळाडूंचे ड्रेसिंग रूम व इतर व्यवस्थेचीही पाहणी करून समाधान व्यक्त केले. रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक सूचना त्यांनी केल्या. 

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी खजिनदार हेमंत देशपांडे, योगेश हिरे, रतन कुईटे, शिवाजी उगले, श्रीपाद दाबक, संजय परिडा, निखिल टिपरी, अनिरुद्ध भांडारकर, चंद्रशेखर दंदणे, तरून गुप्ता, राजु आहेर, संकेत बोरसे आदी उपस्थित होते. 

हे क्रिकेटपटू ठरणार लक्षवेधी 
बीसीसीआयतर्फे आयोजित रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाऱ्या पाच सामन्यांपैकी एक सामना नाशिकमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू तसेच आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व करणारे खेळाडू सहभागी होतील. यामध्ये महाराष्ट्र कडून केदार जाधव तर सौराष्ट्राकडून जयदीप उनाडकट यांचा समावेश आहे. नाशिकचा स्टार क्रिकेटर सत्यजित बच्छाव याची कामगिरी क्रिकेटप्रेमींना बघता येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ranji sparda