हार्ड, बाऊन्सी खेळपट्टी हवी - विराट कोहली

वृत्तसंस्था
Thursday, 23 November 2017

नेहमीप्रमाणे आम्हाला वेळेअभावी सराव करता येणार नाही. आपण बाकी संघांबाबत व त्यांच्या खेळाबाबत मत मांडू शकतो, पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात खेळण्यासाठी जातो तेव्हा आपली किती तयारी झाली आहे, हा विचार करणे आवश्यक आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे कसोटीनंतर त्यांनी केलेल्या खेळावर अवलंबून असते. जेव्हा आम्हाला हवा तसा सराव होतो, आम्ही आमच्या इच्छेनुसार खेळतो, तेव्हा टिकेलाही सामोरे जातो. पण हा सामना आमच्यासाठी एक आव्हान असणार आहे व त्यासाठी ही एक चांगली संधी आहे

नागपूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काहीच दिवसात चालू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकाविरूद्ध कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर, सध्या सुरू असणाऱ्या श्रीलंकाविरूद्ध कसोटी मालिकेसाठी संघ व्यवस्थापनाकडे 'पर्याय नसताना' हार्ड बाऊन्सी खेळपट्टीची विनंती केली आहे.

हार्ड बाऊन्सी खेळपट्टी का हवी असे विचारले असता, 'या मालिकेनंतर अम्हाला दक्षिण आफ्रिकेला जायला फक्त दोनच दिवस मिळत आहेत. त्यामुळे खेळाचे नियोजन व पुढे काय घडणार याचा विचार करायला जास्त वेळ नाही. जर आम्हाला एक महिना सराव करायला वेळ मिळाला असता, तर आम्हाला व्यवस्थित तयारी करता आली असती.'

भारतीय संघ 24 डिसेंबरला श्रीलंकेविरुद्ध अंतिम टि-ट्वेंटी खेळून 27 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला जायला निघेल. कोहलीने मालिका जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींवर भर दिला, कारण त्यावेळेस संघाला मोठ्या मालिकेची तयारी करणे आवश्यक आहे.

'नेहमीप्रमाणे आम्हाला वेळेअभावी सराव करता येणार नाही. आपण बाकी संघांबाबत व त्यांच्या खेळाबाबत मत मांडू शकतो, पण जेव्हा आपण दुसऱ्या देशात खेळण्यासाठी जातो तेव्हा आपली किती तयारी झाली आहे, हा विचार करणे आवश्यक आहे. कोणते खेळाडू निवडायचे हे कसोटीनंतर त्यांनी केलेल्या खेळावर अवलंबून असते. जेव्हा आम्हाला हवा तसा सराव होतो, आम्ही आमच्या इच्छेनुसार खेळतो, तेव्हा टिकेलाही सामोरे जातो. पण हा सामना आमच्यासाठी एक आव्हान असणार आहे व त्यासाठी ही एक चांगली संधी आहे.' असे कोहली म्हणाला. 

'मी 100 टक्के असं ठरवू शकत नाही, की आम्ही जेव्हा बाहेर खेळू तेव्हा दोन फिरकीगोलंदाजांसह खेळू, कारण आमहाला दोन्ही बाजूचा तोल सांभाळणे आवश्यक असते. त्यामुळे अश्विन किंवा जडेजा यांपैकी कोणाला घ्यायचे ते ठरविण्यात येईल. खेळाडूंच्या कामगिरीवर त्यांची निवड अवलंबून आहे व त्यावर संघ निवडला जाईल' असेही तो यावेळी म्हणाला. कोहलीने तातडीच्या वेळापत्रकातही पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Test series against South Africa