esakal | न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand win by five wickets

रॉस टेलर आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. 

न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पल्लिकल (श्रीलंका) - रॉस टेलर आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने रविवारी पहिल्या टी 20 सामन्यात श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 4 बाद 174 धावा केल्या. यात कुशल मेंडिसची अर्धशतकी खेळी निर्णायक ठरली. त्यानंतर न्यूझीलंडने 19.3 षटकांत 5 बा 175 धावा करून विजय मिळविला. 

विजयासाठी 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरवात निराशाजनक झाली. मलिंगाने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूंवर कॉलिन मुन्‍रोला बाद केले. त्यानंतर मार्टिन गुप्टिल आणि टीम सैफर्ट यांना खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे 7.2 षटकांत त्यांची अवस्था 3 बाद 39 अशी झाली होती. तेव्हा ग्रॅंडहोम आणि टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी 35 चेंडूंत 79 धावांची वेगवान भागीदारीकरून विजयाचा पाया भक्कम केला. ग्रॅंडहोमने 28 चेंडूंत 4 चौकार, 2 षटकारांसह 44, तर टेलरने 29 चेंडूंत 3 चौकार, 2 षटकारांसह 48 धावा केल्या. ही जोडी फुटल्यावर डॅरिल मिचेल (नाबाद 25) आणि मिशेल सॅंटनेर (नाबाद 14) यांनी न्यूझीलंडचा विजय साकार केला. 

त्यापूर्वी, श्रीलंकेचे आव्हान सलामीचा फलंदाज कुशल मेंडिस याच्या 53 चेंडूंतील 79 धावांच्या खेळीमुळे उभे राहिले. त्याने 8 चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर निरोशान डिकवेलाच्या 33 धावांची श्रीलंकेच्या डावाला जोड मिळाली. 

संक्षिप्त धावफलक - श्रीलंका 20 षटकांत 4 बाद 174 (कुशल मेंडिस 79, निरोश डिकवेला 33, टिम साऊदी 2-20) पराभूत वि. न्यूझीलंड 19.3 षटकांत 5 बाद 175 (ग्रॅंडहोम 44, टेलर 48, मलिंगा 2-23)

loading image