
क्रिकेटर्सप्रमाणेच आजकाल त्यांच्या वाईफदेखील चर्चेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते. यामधील तिघांच्या वाईफ आजकाल माेठ्या प्रमाणात चर्चेत असतात. त्या म्हणजे विराट- अनुष्का, राेहित-रितिका व आंद्रे रसेल-जस्सीम लॉरा हाेय.
मुंबई ः कुठल्याही क्रिकेटर्सची स्टाईल हि एखाद्या अभिनेत्याहून कमी नसते. हेच एक कारण आहे कि, आजकाल भरपूर क्रिकेटर्स चर्चेचा विषय ठरतात. क्रिकेटर्सप्रमाणेच आजकाल त्यांच्या वाईफदेखील चर्चेत असल्याचे आपणास पाहावयास मिळते. यामधील तिघांच्या वाईफ आजकाल माेठ्या प्रमाणात चर्चेत असतात. त्या म्हणजे विराट- अनुष्का, राेहित-रितिका व आंद्रे रसेल-जस्सीम लॉरा हाेय.
जसे कि आपण सर्वांना माहिती आहे कि, विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील फेमस स्टार अनुष्का शर्मासोबत विवाह केला आहे. अनुष्का शर्मा व विराट कोहली या दोघांची जोडी हि क्रिकेट जगतातील जोडींपैकी सर्वात सुंदर जोडी मानली जाते.
भारतीय टीममधील प्रसिद्ध खेळाडू रोहित शर्मा व त्याची बायको देखील अनेकदा चर्चेत असल्याचे आपण पाहिले असेल. रोहितच्या वाईफबद्दल आज थोडेस जाणून घेऊयात. रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक भारतीय खेळाडू आहे. रोहितचा जन्म महाराष्ट्रामधील नागपूरमध्ये झाला होता. रोहित शर्मा हा टेस्ट क्रिकेट, वनडे आणि ट्वेंटी-ट्वेंटी व्यतिरिक्त इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळतो. त्याचबरोबर तो आयपीएलमधील ‘मुंबई इंडियन्स’ टीमचा कर्णधार आहे.
दरम्यान, रोहित व त्याच्या बायकोची जोडी हि खूपच सुंदर आहे. त्याच्या वाईफचे नाव रितिका सजदेह असे आहे. ती देखील स्टायलिश आहे. अनुष्काप्रमाणेच ती देखील चर्चेत असते. अनुष्का व रितिकापेक्षा देखील एका क्रिकेटर्सची वाईफ सर्वात जास्त हाॅट व या दोघींपेक्षा जास्त चर्चेत असते. ती म्हणजे वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू आंद्रे रसेलची वाईफ. आंद्रे रसेल हा त्याच्या वाईफमुळेच जास्त चर्चेत असतो. जस्सीम लॉरा असे त्याच्या वाईफचे नाव आहे.
दरम्यान, कुठल्या नं कुठल्या कारणामुळे चर्चेमध्ये राहणे हि वेस्टइंडीजच्या हरफनमौला आंद्रे रसेलची सवयच बनली आहे. रसेल हा कधी त्याच्या विचित्र हेअरस्टाईलमुळे, तर कधी बिग बॅश लीगमध्ये काळ्या रंगाच्या बॅटने फलंदाजी करण्यामुळे चर्चेत येतो. ह्या वेळेस आंद्रे रसेल त्याच्या वाईफ जस्सीम लॉरामुळे चर्चेत आला आहे. आंद्रे रसेलची वाईफ लाॅरा सौंदर्याच्या बाबतीत रोहित शर्मा व विराट कोहलीच्या वाईफपेक्षा अधिक सुंदर आहे.
आंद्रे रसेल त्याच्या दमदार फलंदाजी, बॉलिंग व फील्डिंगमुळे खूपच कमी वयात आपले नाव ग्रेट खेळाडूंच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केले आहे. रसेलची वाईफ जस्सीम लॉरा हि जमैकामधील एक मॉडेल आहे आणि ती तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे प्रसिद्ध झाली आहे. वेस्टइंडीज मधील ऑलराउंडर खेळाडू आंद्रे रसेलने त्याची गर्लफ्रेंड जस्सीम लॉरासोबत लग्न केले आहे. स्टार मॉडेल जस्सीम लॉराने २०१४ साली एंगेजमेंट केली होती व तिला अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावरसुद्धा बघण्यात आले आहे. मागील वर्षी ती रसेल आणि केकेआरला आईपीएलला सपोर्ट करण्यासाठी भारतामध्ये आली होती.