मंत्रोपचाराने नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक; भोंदूबाबास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

मंत्रोपचाराने नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक; भोंदूबाबास अटक

अहमदनगर: मंत्रोपचाराने शारिरीक व्याधी दुरुस्त करतो असे सांगून लोकांची फसवणूक करणा-या एका भोंदू बाबास किनगाव पोलिसांनी अटक केली आहे.रेणापूर तालुक्यातील मौजे खलंग्री येथील हाकानी इस्माईल शेख (45 वर्ष) या भोंदूबाबाने मागील दहा ते बारा वर्षापासून सैलानी बाबाचा भक्त आहे असे भासवून कोणालाही झालेली शारीरिक व्याधी, भूतबाधा, करणी, घरगुती भांडणे, नवरा बायको बेबनाव अशा बाबींचा उपचार करतो म्हणून गावातील स्वगृही व्यावसाय थाटला होता. 

गावातील एका अज्ञात इसमास नोकरी लावतो म्हणून लिंबू व नारळ उतरवून देवून त्याच्याकडून पैसे उकळला, नोकरीत यश येत नसल्याने व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या इसमाने लातूर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संपर्क साधला व चालू झाली पुढील कारवाई.या बाबत खातरजमा करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव माधव बावगे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला कार्यवाह रुकसाना इम्रान सय्यद, लातूर शाखेचे सुधीर भोसले, रणजीत आचार्य, दगडू पडीले यांच्यासह अहमदपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चितंबर कामठेवाड, किनगाव येथील सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या सह भोंदू बाबाच्या घरी गेले.रूक्साना सय्यद यांनी मला पोटाचा आजार असल्याचे सांगितले, त्या वेळी नारळ, लिंबू व जडीबूटी देऊन परत वा-या करण्यास सांगितले.

हेही वाचा: OBC विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; कायद्याचा मार्ग मोकळा

कोणत्याही प्रकारचे शरीररचनेचे अधिकृत शिक्षण नसताना उपचार करीत असल्याने या इसमा विरोधात गुरूवारी ( ता.10) गुन्हा नोंद झाला असून या भोंदूबाबास अटक करण्यात आली आहे.या वेळी तेथील लाकडी दान पेटीत असलेले 4 हजार 332 रूपये व अंगझडतीत मिळालेले 5 हजार 60 रूपयेसह कुंकू, जटा असलेले नारळ, काळा दोरा, धातूची घोड्याची मुर्ती, लिंबू, देणगी पुस्तक, अगरबत्ती पुडे, चाकू जप्त करण्यात आले.

भोंदूबाबा व्याधीग्रस्त लोकांवर सैलानी बाबाच्या नावाने मंत्रोपचार करून अगरबत्ती जाळून व लिंबू भारुन तो व्याधीग्रस्त लोकांच्या डोक्यावर कापत असे व व्याधीग्रस्त व्यक्तींच्या अंगातील भूत काढतो असे भासवून लिंबू डोळ्यात पिळणे व अघोरी उपचार करून हाडाचा कर्करोग दुरूस्ती करतो असे सांगत.हा भोंदूबाबा उपचारासाठी धातूच्या पेटी, ताईत, घोरवडी येथील देवस्थानचा फोटो याचाही वापर करीत असत.

हेही वाचा: Maharashtra Budget Session : अजित पवारांच्या अर्थसंकल्पात काय? वाचा एका क्लिकवर

Web Title: Ahamadnager Crime News Arest Police Baba

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :policecrime
go to top