Akola News: चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या आरोपींना अटक; एमआयडीसी पोलिसांची कारवाई; दोन तासांत आरोपी जेरबंद

Mobile Theft Incident in Akola MIDC: अकोला MIDC पोलिसांनी फक्त दोन तासांत चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणाऱ्या दोन आरोपींना अटक केली.
Akola News

Akola News

esakal

Updated on

अकोला: चाकूचा धाक दाखवून तरुणाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत शोधून काढत गुन्ह्याचा छडा लावला.

या कारवाईत एका विधी संघर्षग्रस्त बालकासह एका युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चाकू आणि लुटलेला मोबाईल असा तब्बल २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com