बेळगाव: मोबाईलच्या वादातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी सौंदत्ती तालुक्यातील चिक्कबुदनूरजवळील लक्ष्मीदेवी मंदिरात घडली. .मृताचे नाव फकीराप्पा मल्लप्पा पिड्डेन्नावर (वय ४०, चिक्कबुदनूर, ता. सौंदत्ती) असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पुजारी (वय २५, चिक्कबुदनूर, ता. सौंदत्ती) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फकीराप्पा आणि मल्लिकार्जुन हे मित्र होते..Sonam Wangchuk Health Update : सोनम वांगचुक यांच्या रक्त तपासणीत बदल, हेल्थ बुलेटीनमध्ये डॉक्टर काय म्हणाले? ; २४ तास महत्त्वाचे.काही दिवसांपूर्वी फकीराप्पाने मल्लिकार्जुनचा मोबाईल घेतला होता. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. शुक्रवारी सायंकाळी फकीराप्पा लक्ष्मीदेवी मंदिराच्या छतावर झोपला असताना मल्लिकार्जुन तेथे आला आणि मोबाईल परत देण्याची मागणी केली. त्यावर फकीराप्पाने ‘रात्री मोबाईल देतो, ’ असे सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला..Ramesh Mhatre: रमेश म्हात्रे यांना दणका; जामिनाला स्थगिती, शरण येण्याचे आदेश.मोबाईल परत न दिल्याच्या रागातून मल्लिकार्जुनने मंदिरात अंगारा ठेवण्यासाठी वापरला जाणारा दगड उचलून फकीराप्पाच्या डोक्यावर जोरात मारला. या गंभीर मारहाणीत फकीराप्पाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची पत्नी भारती पिड्डेन्नावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरगोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.