Navi Mumbai: काळी जादू करण्याच्या बहाण्याने भोंदुबाबाने लुटला ७८ लाखांचा ऐवज

Crime News:
Crime News: sakal

Crime News: पतीवर करणी केल्याचे सांगून त्यासाठी पूजाअर्चा, काळी जादू करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने त्याच्या सहकाऱ्यांसोबत वाशीमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीकडून ४२ लाखांचे सोन्याचे दागिने तसेच ३६ लाखांची रोख रक्कम लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अधिकाऱ्याच्या पत्नीला पॅरेलिसिसचा झटका आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी वाशी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सेवानिवृत्त सरकारी अधिकारी असलेले तक्रारदार पवार आपल्या पत्नीसह वाशीमध्ये राहतात. तर त्यांची विवाहित मुलगी ही पतीसह कामोठे येथे राहत आहे. पवार यांनी रत्नागिरी येथे नवीन घर घेतले आहे. या घराच्या बांधकामासाठी गेल्या आठ महिन्यांपासून तेथेच राहत होते.

Crime News:
Crime: साखरपुड्यानंतर समजलं त्याचे दुसरीकडे प्रेमसंबंध आहेत; तरुणीने उचलेले टोकाचे पाऊल

या कालावधीत त्यांची पत्नी वाशी येथील घरामध्ये एकटीच राहत होती. याचाच फायदा उचलत आरोपी नीलेश हातवळणे उर्फ गुरुजीने त्याची पत्नी अर्चना हातवळणे, सागर जेजुरकर, विजय बाबेल, नाना भाऊ, भक्ती, आणि अनुसया कांबळे या सर्वांनी देवभोळी असलेल्या पवार यांच्या पत्नीला जादूटोणा, तंत्रमंत्र व काळ्या जादूची भीती दाखवून, पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने पत्नीला मंतरलेले पाणी व जेवणातून काहीतरी खायला देताना तिच्याकडून ४२ लाख ८ हजार रुपये किमतीचे १०५.२ तोळे सोन्याचे दागिने तसेच ३६ लाख ६५ हजार रुपयांची रक्कम वेगवेगळ्या माध्यमातून लुबाडली आहे. या प्रकरणी पवार यांनी वाशी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती.

पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन

गेल्या महिन्यात पवार यांच्या पत्नीला अचानक ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांना वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पवार यांच्या मुलीने वाशी येथील घरी जाऊन पाहणी केली असता, त्यांच्या घरामध्ये काळी बाहुली, हळद कुंकू, सुया टोचलेले लिंबू दिसून आले होते. त्यानंतर पवार यांच्या घरामध्ये पूजाअर्चा, जादुटोणा, काळी जादू करण्यात आल्याचे आरोपी नीलेश हातवळणे (गुरुजी) व त्याचे अन्य सहकारी विजुभाऊ, अनुसया, अर्चना यांनी पैशाचा पाऊस पाडण्याचे तसेच जमिनीखालून खजिना काढत असल्याचे सांगून त्यासाठी सोने, पैसे, चांदीच्या वस्तू, कपडे याच्या नावाखाली पत्नीकडून लाखो रुपये तसेच सोन्याचे दागिने उकळले आहेत.

Crime News:
Mumbai Crime: अमली पदार्थांच्या सेवनासाठी करत होते मुलांची तस्करी; पोलिसांनी केली अटक

वहीमुळे भांडाफोड

- पवार यांच्यावर कुणीतरी करणी केल्यामुळे लवकरच त्यांचा मृत्यू होणार असल्याचे पाण्यात बघितल्याचे पवार यांच्या पत्नीला सांगितले. तसेच दान धर्म, पूजाअर्चा केल्यानंतर त्यांच्यावर आलेले सर्व विघ्न दूर होतील, असे सांगून नीलेश हातवळणे व त्याच्या सहकाऱ्यांनी लाखो रुपये उकळल्याचे पवार यांच्या पत्नीने वहीमध्ये लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे.

- भोंदूबाबा निलेश हातवळणेने पवार यांच्या पत्नीला पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने गुजरात, अहमदाबाद, नाडोल, अशापुरा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील संगमनेर, साकुर, सावरगाव, खंडोबा, रत्नागिरी, गुहागर, उरण, अहमदनगर व इतर भागात नेले. तसेच त्यांना वेगवेगळ्या पूजा करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून प्रत्येक वेळी त्यांनी रोख रक्कम सोने व चेकच्या माध्यमातून लाखोंचा ऐवज घेतल्याचे वहीमध्ये नमुद असल्याचे पवार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Crime News:
Jalgaon Crime News : श्रीराम रथोत्सवात चोरट्यांची चांदी; मंगळसूत्रांसह मोबाईल, पर्स चोरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com