

Bhor Crime News
esakal
भोर: महुडे (ता. भोर) येथील माळवाडीत दारुड्या मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. समीर काळू मालुसरे (वय ३१) असे अटक केलेल्या मुलाचे नाव असून त्यांने आई बेबी काळू मालुसरे (वय ५२) हिच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून ठार मारले आहे.